Men Health Matters: पुरुषांना 'या' आजारांचा असतो अधिक धोका; आजच काळजी घ्या!

Men Health Matters: प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यामध्ये पुरुषांनी आपल्या आहार आणि जीवनशैलीची विशेष काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला अशा आजारांबद्दल सांगणार आहोत, जे अनेकदा पुरुषांमध्ये दिसतात. त्यांच्यावर वेळीच उपचार फायदेशीर ठरणार आहे.

Aug 10, 2023, 06:00 AM IST
1/5

भारतातील पुरुषांचे आरोग्य झपाट्याने खालावत आहे. आज आम्ही तुम्हाला त्या प्रमुख आजारांबद्दल सांगणार आहोत, जे सामान्यतः पुरुषांमध्ये सामान्यपणे दिसून येतात.

2/5

हे जाणून आश्चर्य वाटेल की, भारतातील 3 पैकी 1 पुरुषाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा हृदयविकार असतो. ४५ वर्षे ओलांडलेल्या पुरुषांमध्ये उच्च रक्तदाब ही सर्वात सामान्य समस्या आहे. हृदयविकार टाळण्यासाठी आहार योग्य ठेवण्याबरोबरच जीवनशैलीत आवश्यक बदल करायला हवेत. 

3/5

आजकाल, कर्करोग हा पुरुषांमधील दुसरा सर्वात गंभीर आजार म्हणून पाहायला मिळतोय. प्रोस्टेट कॅन्सर, कोलन कॅन्सर, स्किन कॅन्सर आणि फुफ्फुसाचा कॅन्सर यांसारख्या समस्या सामान्यतः पुरुषांमध्ये दिसून येतात. 

4/5

मधुमेह हा सध्या एक सामान्य आजार झाला आहे. आजकाल पुरुषांमध्ये मधुमेह हा सायलेंट किलर म्हणून उदयास येत आहे. 

5/5

आजकाल बहुतेक पुरुषांमध्ये डिप्रेशन म्हणजेच नैराश्याची समस्याही दिसून येऊ लागलीये. मुख्य बाब म्हणजे त्यांच्या नैराश्याची जाणीवही नसते.