Mental Health : मनःशांतीसाठी करा हे उपाय, आजच करुन पाहा

मानसिक आरोग्य चांगले असणे खूप महत्त्वाचे आहे. काही उपायांनी अस्वस्थ मनाला लगेच शांती मिळते. त्यामुळे हे उपाय आजच करुन पाहू शकता.

Mar 29, 2023, 10:06 AM IST

Mental Health : मन आणि शरीर नेहमी चांगले आणि शांत ठेवणे महत्वाचे आहे. शांत मनाने गोष्टी चांगल्या आणि पटकन होतात. मन विचलीत असेल आणि त्यामुळे अशा परिस्थितीत, शांत राहण्यासाठी, आपल्याला अनेक क्रियाकलापांमधून जावे लागते.  मन आणि शरीर चांगले राहणे खूप गरजे आहे, म्हणून आपण तणावमुक्त राहण्याचे काही सोपे मार्ग जाणून घ्या.

1/5

कुटुंबासोबत वेळ घालवा

कुटुंबासोबत वेळ घालवा

आपले मन आनंदी ठेवण्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालविणे कधीही चांगले. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणे हा तुमची चिंता दूर करण्याचा आणि इतरांच्या सहवासाचा आनंद घेण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो. एकत्र जेवण करणे असो किंवा फोनवर चॅट करणे असो, प्रियजनांशी संपर्क ठेवल्याने मन ताजे आणि आनंदी राहते. 

2/5

वाचन उत्तम उपाय

वाचन उत्तम उपाय

आपण आपल्या रोजच्या जीवनात सातत्याने तणाखाली असतो. हा तणाव दूर करण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातील ताणतणावांपासून मुक्त राहण्यासाठी वाचन हा एक उत्तम मार्ग असू शकतो. पुस्तक वाचणे कधीही चांगले. तुमच्या आवडीनुसार कांदबरी, कथा, ललित लेख  किंवा मासिक वाचा. तुम्हाला वाचायला आवडेल असे काहीतरी शोधणे तुम्हाला रिलॅक्स आणि आनंद मिळण्यास मदत करेल. यातून तुम्ही तणावमुक्त राहू शकता.

3/5

व्यायाम करा आनंदी राहा

 व्यायाम करा आनंदी राहा

तणावमुक्त राहण्यासाठी व्यायामाची गरज खूप गरजेची आहे. व्यायाम केल्याने तुम्ही ताजेतवान होता आणि दिवसभर आनंदी राहता. शारीरिक व्यायाम हा तणावमुक्त करण्याचा आणि तुमचा मूड वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. धावणे असो, योगा करणे असो किंवा निसर्गात फिरायला जाणे असो, व्यायामामुळे तुमचे मन छान राहते त्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो आणि त्यामुळे तणाव कमी होतो.

4/5

संगीत ऐकणे बेस्ट

संगीत ऐकणे बेस्ट

तणाव कमी करण्यासाठी आणि आनंद राहण्यासाठी चांगले संगीत अर्थात गाणी ऐकणे यावर चांगला उपाय आहे. संगीताचा आपल्या मनःस्थितीवर आणि भावनांवर मोठा प्रभाव पडतो. चांगले आणि आवडते संगीत ऐकल्याने चिंता कमी होण्यास आणि विश्रांतीस प्रोत्साहन मिळू शकते.

5/5

ध्यान केल्याने तणाव दूर

ध्यान केल्याने तणाव दूर

तणाव कमी करण्यासाठी धानधारणा करणे उत्तम. ध्यान हा मन शांत करण्याचा आणि तणाव दूर करण्याचा एक चांगला मार्ग आहे.  एकांतात बसण्यासाठी एक शांत जागा शोधा, डोळे बंद करा आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. चांगले विचार करा, तेव्हा निर्णय न घेता त्यांचे निरीक्षण करा आणि आपले लक्ष आपल्या श्वासाकडे केंद्रीत करा. त्यामुळे तणावातून तुमची सुटका होते.