Chaitra Navratri 2023 Upay : आज महाअष्टमीला प्रगती आणि यशासाठी तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय!

Chaitra Navratri 2023 Upay  : आज महाअष्टमी...आजच्या दिवशी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व्यवसाय आणि प्रगतीसाठी राशीनुसार उपाय केल्यास फायदा होतो असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Mar 29, 2023, 09:44 AM IST

Navratri 2023 Maha Ashtami upay in marathi : चैत्र नवरात्री म्हणजे देवीच्या 9 रुपांची पूजा...या नऊ दिवसात घटस्थापना करुन प्रगती आणि यशासाठी देवीच्या आशिर्वादासाठी पूजा अर्चा केली जाते. नवरात्रीमध्ये अष्टमीला विशेष महत्त्व असतं. महाअष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन (Navratri 2023 Kanya Pujan) केलं जातं.  प्रगती आणि यशासाठी आज अष्टमीच्या दिवशी राशीनुसार उपाय केल्यास फायदा होतो असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. (Chaitra Navratri 2023 Maha Ashtami upay and Ashtami Totke according to zodiac signs job business and money in marathi)

1/12

मेष (Aries)

महागौरीला गुळाची खीर अर्पण करा. लहान मुलींना पिवळं वस्त्र आणि 11 रुपयांची दक्षिणा द्या.

2/12

वृषभ (Taurus)

देवीला काळ्या तीळाचे हवन करा. लहान मुलींना गुलाबी वस्त्र आणि 21 रुपये दक्षिणा द्या.

3/12

मिथुन (Gemini)

देवीला आठ केळी अर्पण करा. लहान मुलींना बाहुली आणि 14 रुपयांची दक्षिणा द्या. 

4/12

कर्क (Cancer)

कर्जमुक्तीसाठी ॐ दुं दुर्गायै नमः नामाचा जप करा. मुलींना पांढरा रुमाल आणि 25 रुपयांची दक्षिणा द्या. 

5/12

सिंह (Leo)

माता दुर्गेला लाल वस्त्र अर्पण करा. लहान मुलींना गुलाबी वस्त्र आणि 21 रुपये दक्षिणा द्या.

6/12

कन्या (Virgo)

देवीला लाल वस्त्र परिधान करुन पूजा करा. लहान मुलींना कथेचे पुस्तक आणि 23 रुपयांची दक्षिणा द्या.

7/12

तूळ (Libra)

देवीला अष्टमीला गोडभोग अर्पण करा. मुलींना पांढरे कपडे आणि 21 रुपयांची दक्षिणा द्या.

8/12

वृश्चिक (Scorpio)

देवीची मनोभावे पूजाअर्चा करावी. लहान मुलींना मेकअपचं सामान आणि 11 रुपयांची दक्षिणा द्या.

9/12

धनु (Sagittarius)

देवीला दही अर्पण करा. मुलींना पेन पेन्सिल, एक खेळणी आणि 14 रुपयांची दक्षिणा द्या.

10/12

मकर (Capricorn)

देवी मातेला लाडू अर्पण करा. मुलींना भांडी सेट आणि 11 रुपये दक्षिणा द्या. 

11/12

कुंभ (Aquarius)

देवीला गोड दही अर्पण करा. मुलींना निळे कपडे आणि 21 रुपये दक्षिणा द्या.

12/12

मीन (Pisces)

अष्टमीच्या रात्री दुर्गा चालीसा वाचावी. मुलींना बाहुली आणि 25 रुपयांची दक्षिणा द्या.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)