Lakshmi Narayan Yoga : लवकरच बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ?

 Lakshmi Narayan Yoga : अधिक मासात बुध गोचरमुळे सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे. त्यामुळे 6 राशींच्या नशिबात पैसाच पैसा असणार आहे. 

Jul 18, 2023, 10:42 AM IST

Lakshmi Narayan Yoga Effects : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एक विशिष्ट वेळानंतर 9 ग्रह आपली स्थिती बदलतो. ग्रह गोचरमुळे काही शुभ अशुभ असे योग तयार होतात. लक्ष्मी नारायण योग हा शुभ योग असून बुध गोचरमुळे (Budh Gochar 2023) सिंह राशीत तो तयार होतो आहे. 

1/9

सिंह राशीत शुक्र विराजमान आहे. बुध गोचर करुन सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुध शुक्रच्या संयोगामुळे अशुभ असा लक्ष्मी नारायण योग जुळून आला आहे.   

2/9

 शुक्र ग्रहाने (Shukra Gochar 2023) 7 जुलैला सिंह राशीत प्रवेश केला असून तो 7 ऑगस्टपर्यंत या राशीत विराजमान राहणार आहे. 

3/9

येत्या 25 जुलैला पहाटे 04:38 वाजता ग्रहांचा राजकुमार बुध सिंह राशीत गोचर करणार आहे. अशा स्थिती  7 ऑगस्टपर्यंत सिंह राशीत लक्ष्मी नारायण योग राहील. या योगामुळे 6 राशींना आर्थिक फायदा होणार आहे. 

4/9

मेष

मेष राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना हा काळ अधिक फायदेशीर असणार आहे. तुमच्या कामात यश मिळणार आहे. अचानक धनलाभ होईल. 

5/9

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. मिथुन राशीच्या स्वामी बुध असल्याने यांना अधिक लाभ होणार आहे. लांब प्रवासचे योग आहेत. लेखक, साहित्यिक आणि संपादकांसाठी सुवर्ण काळ असणार आहे. 

6/9

सिंह

सिंह राशीमध्येच लक्ष्मी नारायण योग तयार होत असल्याने या लोकांना पैशाच पैशाच मिळणार आहे.  त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.   

7/9

तूळ

या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. करिअर आणि व्यवसायात फायदा होणार आहे. कला-सांस्कृतिक क्षेत्राशी लोकांसाठी हा काळ उत्तम असणार आहे.    

8/9

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग भाग्यशाली ठरणार आहे. बुध गोचरमुळे तुमच्या आयुष्यात प्रेमाची दिवस येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ असणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. आर्थिक स्थिती चांगली होईल. 

9/9

वृश्चिक

वृश्चिक राशीचे लोकांसाठी हा काळ प्रगतीची ठरणार आहे. करिअरमध्ये यशाचे नवीन मार्ग तुम्हाला गवसणार आहे. बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे. व्यावसायिकांसाठी चांगला काळ असेल.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)