मुंबईकरांनो गणेश दर्शनासाठी घराबाहेर पडण्याआधी व्हा अलर्ट! हवामान विभागाचा यलो अलर्ट

मुंबईकरांनो गणेशदर्शनासाठी रविवारी बाहेर पडणार असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण हवामान विभागाने मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

Sep 24, 2023, 08:28 AM IST
1/7

मुंबईत तीन दिवस यलो अलर्ट

Yellow alert for three days in Mumbai

भारतीय हवामान खात्याने मुंबईत गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारा येण्याची शक्यता असल्यामुळे यलो अलर्ट जारी केला.

2/7

कुलाबा वेधशाळेत 15.8 मिमी पावसाची नोंद

Colaba Observatory recorded 15.8 mm rainfall

कुलाबा किनारपट्टी वेधशाळेने यलो अलर्ट असताना शुक्रवार आणि शनिवारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. दरम्यान, शनिवारी दुपारी सांताक्रूझ हवामान केंद्रात 5.3 मिमी तर कुलाबा वेधशाळेत 15.8 मिमी पावसाची नोंद झाली

3/7

मुंबईच्या तलावात 14.24 दशलक्ष लिटर पाणीसाठा

Mumbai lake

हलक्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या सात तलावांमधील पाणीसाठा 98.39 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

4/7

ठाणे आणि रायगडसाठीही अलर्ट

Yellow alert for Thane and Raigad

ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी मंगळवारपर्यंत (26 सप्टेंबर) यलो अलर्ट वाढवण्यात आला आहे. 

5/7

का पडतोय इतका पाऊस

raining

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत. तसेच उत्तरेत पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने हिमालयाच्या पायथ्यापासून खालपर्यंत पाऊस सुरु आहे.

6/7

महाराष्ट्रातही मुसळधार

Heavy rain in Maharashtra

सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र असा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात गेल्या 24 तासांत अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे.

7/7

विदर्भात जोरदार पाऊस

Heavy rain in Vidarbha

पावसाचा जोर विदर्भात जास्त राहणार असून उर्वरित राज्यात जोर कमी राहणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.