आकाशात जाऊन पुन्हा पृथ्वीवर परतणार Bikini, इस्रोचं नवं मिशन

 इस्रोचं आता Bikini मिशन लाँच करणार आहे. जाणून घेवूया नेमकं काय असणार आहे मिशन.  

Sep 23, 2023, 20:02 PM IST

Bikini Spacecraft : मिशन चांद्रयान 3 आणि आदित्य L1 यांच्या यशानंतर इस्रो आणखी एकर मिशन राबवणार आहे. 'बिकिनी' असं या मिशनचं नाव  आहे. एका यूरोपीयन कंपनीचं हे मिशन इस्रोकडून लॉन्च केलं जाणार आहे. 

1/7

बिकिनी स्पेसक्राप्ट हे यूरोपियन स्टार्टअप द एक्सप्लोरेशन कंपनीचं री एन्ट्री व्हेईकल आहे. री एन्ट्री मॉड्यूल निक्सचं छोटं व्हर्जन आहे. 

2/7

 Bikini Spacecraft यूरोपियन एरियनस्पेसला दिलं जाणार होतं. मात्र, नंतर भारताच्या न्यूस्पेस इंडिया लिमिटेडने हे मिशन मिळवलं आबे. कारण एरियन 6 रॉकेटच्या डेव्हल्पमेंटमध्ये उशीर होत होता. आता बिकिनीला पीएसएलव्ही रॉकेटच्या चौथ्या स्टेजवरुन Bikini Spacecraft  अवकाशात झेपावेल. 

3/7

Bikini Spacecraft मिशन अंतर्गत द एक्स्प्लोरेशन कंपनीला जो डेटा मिळणार आहे, त्याचा भविष्यात री एन्ट्री आणि रिकव्हरी टेक्नॉलॉजीमध्ये विकसित केला जाणार आहे.  

4/7

पीएसएलव्ही रॉकेट Bikini Spacecraft ला पृथ्वीपासून 500 किलोमीटर उंचावर नेऊन सोडेल. 

5/7

Bikini Spacecraft चं वजन केवळ 40 किलो आहे. यामुळे  त्याच्या री एन्ट्रीबाबत अनेक पडताळण्या केल्या जातील. 

6/7

अवकाश मोहिमेदरम्यान आतराळात आवश्यक असलेल्या सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी  Bikini Spacecraft मदत करेल. 

7/7

2024 मध्ये इस्रोच्या पीएसएलव्ही रॉकेटमधून Bikini Spacecraft लाँच केले जाणार आहे.