मिथुन चक्रवर्तींच्या मुलाचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण
राजकुमार संतोषी यांच्या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून नमाशी पदार्पण करणार.
मुंबई : जेष्ठ अभिनेते यांनी ८०च्या दशकात आपल्या अभिनयाने अनेक चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवले होते. आता त्यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. राजकुमार संतोषी यांच्या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून नमाशी पदार्पण करणार आहे. नुकताच त्याने चित्रपटातील सह-कलाकार अमरिन कुरैशीसोबत एक फोटोशूट केलं आहे. सध्या त्यांचा हा फोटोशूट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.