ब्लू प्रिंट बनवण्यापेक्षा ब्लू फिल्म बनवली असती तर तुम्ही पाहिली तरी असती! राज ठाकरेंची फटकेबाजी

| Aug 05, 2024, 11:46 AM IST
1/8

ब्लू प्रिंट बनवण्यापेक्षा ब्लू फिल्म बनवली असती तर तुम्ही पाहिली तरी असती! राज ठाकरेंची फटकेबाजी

MNS Chief Raj Thackeray Crack Joke on Blue Print and Blue Film Maharashtra Politics

Raj Thackeray On Blue Print: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या बोलण्याच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. त्यांच्या इतरा हजरजबाबीपणा फार क्वचित जणांना जमतो. त्यामुळे त्यांचे भाषण किंवा पत्रकार परिषद ऐकणे हे श्रोत्यांसाठी पर्वणी असते.

2/8

सोलापूर दौऱ्यावर

MNS Chief Raj Thackeray Crack Joke on Blue Print and Blue Film Maharashtra Politics

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली. येथे पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यावर भाष्य केले. पण ब्लू प्रिंट आणि ब्लू फिल्म यासंदर्भातील केलेल्या त्यांच्या भाष्याची चांगलीच चर्चा रंगली. 

3/8

महाराष्ट्राच्या शाश्वत विकासावर भाष्य

MNS Chief Raj Thackeray Crack Joke on Blue Print and Blue Film Maharashtra Politics

राज ठाकरेंच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट जाहीर केली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या शाश्वत विकासावर भाष्य करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या विकास कसा होऊ शकतो, त्यासाठी कशाची गरज आहे? याचा सविस्तर तपशील यात देण्यात आला होता.

4/8

ज ठाकरेंची खंत

MNS Chief Raj Thackeray Crack Joke on Blue Print and Blue Film Maharashtra Politics

मनसेच्या ब्लू प्रिंटची दखल जनतेने फारशी गांभीर्याने घेतली नसल्याची खंत राज ठाकरेंनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. सोलापूर दौऱ्यात देखील त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे काय म्हणाले? हे जाणून घेऊया.

5/8

लोकांनी ती पाहिली तरी असती

MNS Chief Raj Thackeray Crack Joke on Blue Print and Blue Film Maharashtra Politics

मी एकदा पत्रकार परिषदेत असताना एका पत्रकाराने मला विचारलं होतं की, 'तुम्ही जी ब्लू फिल्म आणली होती.' यावर मी त्यांना म्हटलं की, 'मी ती आणली असती तरी बरं झालं असतं. किमान लोकांनी ती पाहिली तरी असती.'

6/8

ब्लू प्रिंट कुठे गेली?

MNS Chief Raj Thackeray Crack Joke on Blue Print and Blue Film Maharashtra Politics

ब्लू प्रिंट आणेपर्यंत 'साहेब, ते ब्लू प्रिंटचं काय झालं?' असे मला सर्वजण खोचकपणे विचारायचे. ब्लू प्रिंट कुठे गेली? ब्लू प्रिंट आली नाही, असे सारे म्हणत असायचे.

7/8

कोणी प्रश्न विचारला नाही

MNS Chief Raj Thackeray Crack Joke on Blue Print and Blue Film Maharashtra Politics

ज्या दिवशी ब्लू प्रिंट आणली, त्या दिवसापासून आजपर्यंत मला कोण्याही पत्रकाराने मला त्या ब्लू प्रिंटचं काय झालं असा प्रश्न विचारला नाही. 

8/8

मी दुसरं आणलं असतं तर..

MNS Chief Raj Thackeray Crack Joke on Blue Print and Blue Film Maharashtra Politics

मी दुसरं आणलं असतं तर बरं झालं असतं, घराघरात पाहिली तरी असती. आतापर्यंत पाठपण झाली असती त्यांची.