बुलंदशहर पोलीस स्टेशनवर जमावाने कसा केला हल्ला

Dec 04, 2018, 14:12 PM IST
1/7

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांनी सोमवारी या हिंसेवर दु:ख व्यक्त करत शहीद पोलीस इंस्पेक्टर यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत जाहीर केली आहे.

2/7

बुलंदशहरात झालेल्या या हिंसेत सुमित नावाच्या एका युवकाचा देखील मृत्यू झाला आहे. त्याला गोळी लागली होती. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पण अजून हे स्पष्ट झालेलं नाही की त्याला गोळी कोणाच्या बंदुकीतून लागली.

3/7

हिंसा सुरु होताच लोकांनी अनेक गाड्यांना आग लावली. पोलीस स्थानकावर हल्ला केला. हिंसा रोखण्यासाठी सुबोध कुमार सिंह यांनी हवेत फायरिंग केली पण त्यानंतर लोकांनी त्यांच्यावरच हल्ला केला. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

4/7

हिंसा होत असताना तेथे तैनात असलेले पोलीस स्थानकाचे इंस्पेक्टर सुबोध सिंह यांनी लोकांना शांत होण्याचं आवाहन केलं. पण लोकांनी त्यांच्यावरच हल्ला केला.

5/7

बुलंदशहरच्या चिंगरावठी पोलीस स्थाकाच्या अंतर्गत येणाऱ्या महाव गावच्या आजुबाजुला गायीचे काही अवशेष सापडले आहेत. हे अवशेष पाहून लोकांना राग आला आणि त्यांनी पोलीस स्थानकाजवळ हिंसा केली.

6/7

व्हिडिओ आणि फोटोवरुन आरोपींची ओळख

व्हिडिओ आणि फोटोवरुन आरोपींची ओळख

पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस स्थानकात जी हिंसा झाली त्यामध्ये चिंगरावठी आणि महाव गावच्या लोकांचा समावेश असू शकतो. कारण ही 2 गावं पोलीस स्थानकाच्या जवळ आहे.

7/7

पोलीस स्टेशनवर हिंसा पसरवणाऱ्या दोघांना अटक

पोलीस स्टेशनवर हिंसा पसरवणाऱ्या दोघांना अटक

जमावाच्या हल्ल्यात पोलीस इन्स्पेक्टरसह एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर 2 पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे.