गणपतीसाठी 'मोदी एक्सप्रेस' जाणार कोकणात, खाण्या-पिण्याचीही सोय; बुकींग कुठे कराल? जाणून घ्या

Modi Express:17 सप्टेंबरला सकाळी साडेबाराला दादरच्या फलाट क्रमांक आठ वरून मोदी एक्सप्रेस दरवर्षीप्रमाणे सुटणार आहे. 5 ते 10 सप्टेंबर दरम्यान याचे बुकिंग केले जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

| Sep 01, 2023, 10:50 AM IST

Modi Express: भाजप आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यंदाची मोदी एक्सप्रेस स्पेशल आहे. कारण 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस आहे. त्यानिमित्त आपण मोदी एक्सप्रेस सोडत असल्याचे नितेश राणे यावेळी म्हणाले. 

1/9

गणपतीसाठी 'मोदी एक्सप्रेस' थेट कोकणात, खाण्या-पिण्याचीही सोय; बुकींग कुठे कराल? जाणून घ्या

Modi Express for Konkanians for Ganapati Festival know How book

Modi Express for Ganapati festival: मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. गणपतीला जाणाऱ्यासाठी तुम्ही अजूनही तिकीट काढले नसाल किंवा कन्फर्म झाले नसेल तरी काळजी करु नका. कारण आता मोदी एक्सप्रेसने थेट तुम्हाला कोकणात जाता येणार आहे. 

2/9

पंतप्रधानांचा वाढदिवस

Modi Express for Konkanians for Ganapati Festival know How book

भाजप आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.यंदाची मोदी एक्सप्रेस स्पेशल आहे. कारण 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस आहे. त्यानिमित्त आपण मोदी एक्सप्रेस सोडत असल्याचे नितेश राणे यावेळी म्हणाले. 

3/9

कोकणवासियांना गिफ्ट

Modi Express for Konkanians for Ganapati Festival know How book

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त कोकणवासियांना गिफ्ट देण्यात आले आहे. तिकिट कन्फर्म न होणे, खासगी बस चालकांनी वाढवलेले भाडे यामुळे चाकरमानी त्रस्त होते. त्यांना आता मोदी एक्सप्रेसमुळे थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

4/9

फलाट क्रमांक 8 वरून

Modi Express for Konkanians for Ganapati Festival know How book

17 सप्टेंबरला सकाळी साडेबाराला दादरच्या फलाट क्रमांक 8 वरून मोदी एक्सप्रेस दरवर्षीप्रमाणे सुटणार आहे. 5 ते 10 सप्टेंबर दरम्यान याचे बुकिंग केले जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली.

5/9

मंडल अध्यक्षांना संपर्क

Modi Express for Konkanians for Ganapati Festival know How book

कणकवली विधानसभेच्या सर्व मंडल अध्यक्षांना आपण संपर्क करून ती बुकिंग करू शकता, असे आवाहन आमदार नितेश राणेंनी केले आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे ट्रेनमध्ये खाण्याची आणि पिण्याची सोय यावर्षीही केलेली आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

6/9

312 गणपती स्पेशल ट्रेन

Modi Express for Konkanians for Ganapati Festival know How book

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने मिळून गणपती उत्सवापूर्वी 312 गणपती स्पेशल ट्रेन चालवण्याबाबत चर्चा केली आहे. यादरम्यान मध्य रेल्वेतर्फे 257 गणपती विशेष गाड्या आणि पश्चिम रेल्वेतर्फे 55 गाड्या चालवण्यात येणार आहेत.

7/9

'गणपती स्पेशल ट्रेन'

Modi Express for Konkanians for Ganapati Festival know How book

या गाड्या मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध रेल्वे स्थानकांतून चालवल्या जातील. भाविकांना वाहतुकीत कोणतीही अडचण येऊ नये म्हणून यावर्षी रेल्वेने 312 'गणपती स्पेशल ट्रेन' चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

8/9

प्रवाशांची वर्दळ

Modi Express for Konkanians for Ganapati Festival know How book

2022 मध्ये या मार्गावरुन एकूण 294 गाड्या सोडण्यात आल्या होत्या. तर यंदा त्यापेक्षा 18 गाड्या जास्त आहेत. रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. साधारणत: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेमध्ये गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांची वर्दळ असते. 

9/9

94 अनारक्षित गाड्या

Modi Express for Konkanians for Ganapati Festival know How book

मुंबईला इतर राज्यांशी जोडणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या जास्त आहे.  यावर्षी 94 अनारक्षित गाड्या असतील तर गेल्या वर्षी त्यांची एकूण संख्या केवळ 32 होती.