मोहम्मद शमीची आयपीएलसाठी तयारी सुरु

Apr 03, 2018, 14:49 PM IST
1/6

Shami started Practice

Shami started Practice

गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकलेला मोहम्म शमीने सोमवारी फिरोजशहा कोटला मैदानावर सराव केला.   

2/6

wife accused shami

wife accused shami

गेल्या महिन्यात शमीची पत्नी हसीन जहांने शमीविरोधात घरगुती हिंसाचार, लैंगिक छळ प्रकरणी खटला दाखल केलाय. शमी मॅचफिक्सिंगमध्येही सहभागी असल्याचा आरोप शमीच्या पत्नीने केलाय.   

3/6

Shami is still injured

Shami is still injured

दिल्लीहून डेहराडून येथे जात असताना शमीच्या कारला अपघात झाला. ट्रकने कारला धडक दिली यात शमीच्या डोक्याला डाव्या डोळ्याजवळ दुखापत झाली.   

4/6

Not fully recovered

Not fully recovered

दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर शमीने दिल्ली डेअरडेविल्सच्या खेळाडूंसोबत सराव केला. दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातून शमी अद्याप पूर्णपणे सावरला नाहीये.   

5/6

At last he will play

At last he will play

मैदानाबाहेर सुरु असलेल्या वादविवादांमुळे शमी आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबतही शंका होती. मात्र बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळणार आहे.   

6/6

DD retained shami

DD retained shami

मोहम्मद शमीला या वर्षी आयपीएलच्या लिलावात सनरायजर्स हैदराबादने ३.० कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र दिल्ली डेअरडेविल्सने त्याला रिटेन केलेय. या वर्षी शमीची बेस प्राईज १ कोटी रुपये होती.