...अन् 16 वर्ष छोट्या अभिनेत्रीने लगावली आमीरच्या कानाखाली; बॉडीगार्ड फक्त पाहत राहिला

...अन् 16 वर्ष छोट्या अभिनेत्रीने लगावली आमीरच्या कानाखाली; बॉडीगार्ड फक्त पाहत राहिला  

Dec 03, 2023, 16:23 PM IST
1/9

बॉलिवूड अभिनेत्री मोना सिंग थ्री इडियट्स चित्रपटात फार महत्त्वाच्या भूमिकेत होती.   

2/9

चित्रपटात मोना सिंग करीना कपूरच्या मोठ्या बहिणीच्या भूमिकेत होती. चित्रपटात मोनाने डिलिव्हरीचा एक सीन दिला होता ज्याची आजही चर्चा होते.   

3/9

या सीनमध्ये दाखवण्यात आलं होतं की, पावसात अडकल्याने मोना रुग्णालयात जाऊ शकत नाही. यानंतर आमीर खान आणि करीना व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने प्रसूती करतात.   

4/9

मोना सिंगने इतक्या वर्षानंतर या सीनबद्दल खुलासा करताना सांगितलं की, तिने आमीर खानच्या कानाखाली लगावली होती.   

5/9

Humans of Bombay ला दिलेल्या मुलाखतीत मोनाने सांगितलं की, टेबल टेनिस सीन फार गंभीर होता. यावेळी प्रत्येकजण आपापली स्टोरी शेअर करत होते.   

6/9

राजकुमार हिरानी यांनी सांगितलं की, माझ्या पत्नीने मला लाथ घातली होती. माधवनने सांगितलं की, पत्नीने मारलं होतं. यानंतर मी काय करु असा विचार करत होते.   

7/9

यानंतर आमीरने मला कानाखाली मारण्यास सांगितलं. मी सीनमध्ये कानाखाली मारली, पण ती फार जोरात नव्हती. त्यावेळी आमीरने जोरात मारण्यास सांगितलं असता मीही एकदम वेगाने कानाखाली लगावली.   

8/9

मला आठवतंय त्यावेळी त्याचा बॉडीगार्ड माझ्याकडे रागाने पाहत होता. मलाही वाईट वाटत होतं. पण आमीरला नैसर्गिक गोष्टी आवडत असल्याने त्याने आपला अभिनय पुढे सुरु ठेवला.   

9/9

आमीरला सीन एकदम खरा हवा होता आणि मी तो चांगला दिला असं मोनाने सांगितलं.