Monsoon Places : महाराष्ट्रातील सर्वात फेमस मान्सून स्पॉट; ये नही देखा तो क्या ही देखा...

पावसाळ्यात महाराष्ट्रातील या ठिकाणी फिरायला जायचा प्लान नक्की करा. 

| Jul 10, 2024, 00:22 AM IST

Monsoon Places In Maharashtra : पावसाळ्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वर्गाची अनुभती येते. निसर्ग सौंदर्य बहरते. जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्वात फेमस मान्सून स्पॉट. पावसळ्यात एकदा तरी नक्की या ठिकाणांना भेट द्या. 

1/7

महाराष्ट्रातील ही सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळे आहेत. पावसाळ्यात ही ठिकाणी अतिशय सुंदर होते. पावसाळ्यात इथली सफर म्हणजे स्वर्गाची सफर. 

2/7

भंडारदरा

भंडारदरा हे देखील महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. अहमदनगर जिल्ह्यात, अकोले तालुक्यात प्रवरा नदीच्या परिसरात हे निसर्गरम्य ठिकाण आहे. पावसाळ्यात निसर्गसौंदर्य आणखी खुलून येथे. 

3/7

आंबोली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे कोकणातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. डोंगर-दर्याा, जंगल, धबधबे, समुद्र पर्यटकांना मोहित करुन टाकतात.

4/7

गगनबावडा

कोल्हापुरातील गगनबावडा हे महाराष्ट्रातील लोकप्रिय हिलस्टेशन आहे. इथल्या थंडगार आणि अल्हाददायी वातावरण मन प्रसन्न करते. 

5/7

लोणावळा खंडाळा

लोणावळा खंडाळा हे पुणे आणि मुंबईकरांचे आवडते डेस्टिनेशन आहे. शहरापासून अगदी जवळ असलेल्या या ठिकाणांना भेट दिल्यावर मूड रिफ्रेश होतो.

6/7

महाबळेश्वर

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि गर्द झाडी अतिशय नयनरम्य निसर्गसौंदर्य येथे अनुभवता येते. इथं सर्वत्र धुक्याची चादर पसरते. 

7/7

माथेरान

माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. मुंबई शहरापासून अगदी जवळ असलेले माथेरान थंड हवेचे ठिकाण आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले माथेरान अतिशय सुंदर आहे. पावसाळ्यात येथे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात.