#Monsoon : हिरवा निसर्ग हा भवतीने...

Jun 16, 2020, 19:03 PM IST
1/5

#Monsoon : हिरवा निसर्ग हा भवतीने...

हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आणि निसर्ग चक्रीवादळामुळं काही दिवस लांबलेला मान्सून अखेर महाराष्ट्रावर कृपा करताना दिसत आहे. 

2/5

#Monsoon : हिरवा निसर्ग हा भवतीने...

कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रायगडसह मुंबईतही मान्सूनचं आगमन झालं आहे.   

3/5

#Monsoon : हिरवा निसर्ग हा भवतीने...

कुठे मुसळधार सरी, कुठे ढगांचा गडगडाट, वीजांचा कडकडाट अशा वातावरणात हा वरुणराजा आता हजेरी लावू लागला आहे. 

4/5

#Monsoon : हिरवा निसर्ग हा भवतीने...

कोल्हापूर, नाशिक या भागांमध्ये तर मुसळधार पावसामुळं सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या, पूल पाण्याखाली गेल्याच्याही घटना घडल्याचं पाहायला मिळालं.   

5/5

#Monsoon : हिरवा निसर्ग हा भवतीने...

पावसाचा शिडकावा होताच निसर्गाचे रंगही बदलू लागले असल्याचं दिसत आहे. अतिशय सुरेख अशा या हिरवाईनं अनेकांचं मन निसर्गाच्या लीलांनी भारावून जात आहे. त्यामुळं फक्त हिरवाईच नव्हे, तर आवेगानं वाहणारे धबधबेही आता या निसर्गाचं रुपडं पालटू लागले आहेत. त्यामुळं हे एकंदर चित्र पाहता राज्यात खऱ्या अर्थानं मान्सून स्थिरावला आहे असं म्हणायला हरकत नाही.