September 2024 Horoscope : मेषपासून मीन राशीपर्यंत लोकांनी सप्टेंबरमधील 'या' दिवशी सांभाळून राहवे

Monthly Horoscope September 2024 in Marathi : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी मासिक शिवरात्री आणि दुसऱ्या दिवशी सोमवती अमावस्या, पोळा आणि शेवटचा श्रावण सोमवार आहे. सप्टेंबर महिना म्हणजे श्री गणेशाच आगमन.. हा महिना तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या मेष ते मीन मासिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून 

Sep 01, 2024, 10:09 AM IST
1/12

मेष (Aries September 2024 )

सप्टेंबर महिना मेष राशीच्या लोकांसाठी संमिश्र असणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आनंदीच आनंद असेल. या महिन्यात तुम्हाला कुटुंबाचे सहकार्य लाभणार आहे. नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण असणार आहे. बिझनेस करणाऱ्या लोकांना आर्थिक फायदा मिळणार आहे. त्यांना बाहेर गावी जावं लागणार आहे. तर नोकरीच्या शोधात असणाऱ्या छान ऑफर मिळणार आहे. निर्णय घेताना शंभर वेळा विचार करा. विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जी मेहनत केली त्याचे फळ मिळणार आहे. प्रेमसंबंधासाठी या महिन्यात सावधगिरी बाळगा. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आंबट गोड असणार आहे. प्रकृती साधारण असणार आहे.   

2/12

वृषभ (Taurus September 2024 )

सप्टेंबर महिना हा या राशीच्या लोकांसाठी संकटांचा असणार आहे. सुरुवातीच्या काळात आरोग्य आणि नातेसंबंधाकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागणार आहे. जुन्या आजार त्रासदायक ठरणार आहे. कुटुंबात वादविवाद होणार आहे. तर व्यवसायिकांना कठीण स्पर्धेला समोरे जावं लागणार आहे. करिअर आणि व्यवसायत मेनहतीच फळ मिळणार आहे. तुमचा आलेख चढता असणार आहे. मात्र या महिन्यात अनावश्यक खर्च तुमचं बजेट गडबडणार आहे. कामात नशिबाची साथ मिळणार आहे. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा त्याकडे दुर्लक्ष करु नका.   

3/12

मिथुन (Gemini September 2024 )

या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना अनेक आव्हानांचा असणार असून अनेक नवीन संधीही त्यांना मिळणार आहे. नोकरीसंदर्भात मोठे बदल होणार आहेत. या महिन्यात आवडत्या व्यक्तीच्या भेटीने मनं प्रसन्न असणार आहे. कुटुंबासोबत आनंदायी वेळ घालवणार आहात. विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात नसणार आहे. कामाच्या ठिकाणी अडथळे येणार आहेत. पण तुमच्या क्षमतेने तुम्ही त्यावर मात करणार आहात. तर प्रेमसंबंधासाठी हा महिना चांगला असणार आहे. आर्थिक लाभाच्या संधीही तुम्हाला मिळणार आहे. जोडीदारासोबत आनंदाने वेळ व्यतित करणार आहात. नात्यात काही अडचणी तर वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होणार आहेत. पोटाच्या आजाराकडे दुर्लक्ष करु नका. 

4/12

कर्क (Cancer September 2024 )

या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना कठीण असणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. मात्र कामात मित्रांची साथ मिळणार आहे. समस्याने तुम्ही घेरले असणार आहात आणि त्यावर मात करताना तुमच्या बुद्धीची कसोटी लागणार आहे. या महिन्यात बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवसायिकांसाठी हा महिना हळूवार नफाचा असणार आहे. तर नोकरदार लोकांचं कामाच्या ठिकाणी कौतुक होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली असणार आहे.  प्रेम संबंधांच्या दृष्टीकोनातून हा काळ फार काही चांगला नसणार आहे. त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होणार आहे. पण महिन्याच्या अखेरीस वाद संपुष्टात येणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असणार आहे. जोडीदारासोबत धार्मिक स्थळी जाणार आहात.   

5/12

सिंह (Leo September 2024 )

या लोकांना सप्टेंबर महिन्यात वेळ, पैसा आणि शक्तीचे नियोजन योग्य पद्धतीने करावे लागेल अन्यथा त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घर, वाहन इत्यादींवर पैसे खर्च होणार आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. घरात वातावरण अशांत असणार आहे. त्यामुळे तुम्ही जरा चिंतेत असणार आहात. नोकरीत बदल करताना हितचिंतकांचा सल्ला घ्या. आर्थिक व्यवहार करताना त्यांच्या म्हणानुसार करु नका. या महिन्यात रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा होणारी कामंही होणार नाही आणि नात्यांमध्ये दूरावा येईल. मात्र दुसरीकडून मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी कानावर पडणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे.   

6/12

कन्या (Virgo September 2024 )

या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना फार चांगला नसणार आहे. तुमच्या राशीतील ग्रहांचे संक्रमण तुम्हाला आरोग्याशी संबंधित चिंतेमुळे त्रास देणार आहे. भांडणे, वाद आणि न्यायालयीन प्रकरणांशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने लागणार आहेत. धर्म आणि अध्यात्माची आवड वाढणार आहे. गरजू लोकांच्या मदतीसाठी तुम्ही पुढे असणार आहात. तुमची रणनीती आणि योजना गोपनीय ठेवून काम केल्यास तुम्ही अधिक यश प्राप्त होणार आहे. स्पर्धेत भाग घेणारे विद्यार्थी आणि त्यांच्या मित्रांना परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहे. महिन्याच्या 22-23 तारखेला काळजी घ्या. आर्थिक स्थिती गडबडणार आहे. या महिन्यात अनेपक्षित अनेक खर्च होणार आहे. जोडीदारासोबत नातं आंबट गोड असेल. घरात वातावरण प्रसन्न असणार आहे.   

7/12

तूळ (Libra September 2024 )

सप्टेंबर महिना तुळ राशींसाठी गणरायाच्या कृपने आनंद आणि सौभाग्य घेऊन येणार आहे. ठरवलेली कामं वेळेपूर्वीच पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुम्ही समाधानी आणि आनंदी असणारा आहात. या महिन्यात मित्रांची चांगली साथ मिळणार आहे. मात्र महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात थोड्या अडचणी येणार आहे. पण तुम्ही त्यावरही सहज मात करणार आहात. हा महिन्या नोकरदार आणि व्यवसायिकांसाठी उत्तम असणार आहे. उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत तुम्हाला गवणसणार आहे. सुखसोयी आणि चैनीशी संबंधित गोष्टींवर खर्च होणार आहे. प्रेमसंबंधासाठी हा महिन्या चांगला असणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असेल. आरोग्य उत्तम असणार आहे.   

8/12

वृश्चिक (Scorpio September 2024 )

सप्टेंबर महिना हा या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. आर्थिक लाभासह अडकलेली कामं मार्गी लागणार आहे. व्यवसायिकांना शुभ असा हा महिना असणार आहे. विद्यार्थ्यांसाठीही आनंदी असा हा महिना आहे. नोकरीदार सहज काम करणार असून त्यांना अपेक्षित यश मिळणार आहे. नातेसंबंध सुधारणार आहे. प्रेमात अनुकुल वातावरण असणार आहे. कुटुंबात शुभ कार्य होणार असल्याने वातावरण आनंदी असणार आहे. आरोग्यही चांगली साथ देणार आहे. एकंदीत हा महिना वृश्चिक राशीसाठी उत्तम राहणार आहे.     

9/12

धनु (Sagittarius September 2024 )

या राशीच्या लोकांनी मानसिकदृष्ट्या जसे आहे तसेच राहील. तुम्हाला तुमचा वर्तमान आणि भविष्य दोन्हीची योजना चांगल्या रणनीतीने करावी लागेल. तुम्ही गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये मोठी गुंतवणूक करावी, पण हो जास्त धोका असलेल्या कोणत्याही प्रकल्पात पैसे गुंतवू नका. नोकरीशी संबंधित लोक चांगले काम करतील. महिला सहकारी आणि महिला बॉस तुमच्या पक्षात येऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या कामाची प्रत्येक अपडेट तुमच्या उच्च अधिकारी आणि बॉसला देत राहा. सजावट आणि गृहोपयोगी वस्तूंशी संबंधित व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल तर परदेशी कंपन्यांशीही संबंध तयार होताना दिसत आहेत. तरुणांसाठी मानसिक तणाव राहील, इतरांच्या छोट्या गोष्टी तुम्हाला त्रास देऊ शकतात. पण इतरांशी कठोरपणे वागू नका हे लक्षात ठेवा. सप्टेंबर महिन्यात जोडीदाराच्या रागात वाढ किंवा बीपीची तक्रार दिसून येईल. संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी महिनाभर स्वच्छतेची काळजी घ्या. 

10/12

मकर (Capricorn September 2024 )

सप्टेंबर महिन्यात मकर राशीच्या लोकांना खूप गोड आणि विचारपूर्वक बोलावे लागेल. तुमच्या कलात्मक आणि व्यावसायिक बोलीमुळे नफा होऊ शकतो. सुधारण्याची प्रवृत्ती तुम्हाला अडचणीत आणू शकते, म्हणून गोष्टी आहेत तशा सोडणे तुमच्यासाठी चांगले आहे. नोकरीशी संबंधित बाबींमध्ये नशीब तुम्हाला अनुकूल करेल, जर तुम्ही बढती आणि बदलीच्या तयारीत व्यस्त असाल तर काही दानधर्म करा. महिन्याच्या अखेरीस तुम्हाला नक्कीच काही चांगली बातमी मिळेल. परदेशी संबंधांच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करणाऱ्यांनी विलंब न करता शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. नफा मिळविण्यासाठी यावेळी काही नवीन गुंतवणूक करावी लागेल. दातांची काळजी घ्या आणि खाण्याच्या सवयी अशा प्रकारे ठेवा की पोटाच्या आजारांपासून दूर राहता येईल. वैवाहित जीवन आनंदी असेल. तर प्रेमसंबंधात आंबट गोड अनुभव येतील. 

11/12

कुंभ (Aquarius September 2024 )

या लोकांसाठी हा महिना संमिश्र असणार आहे. या राशीच्या लोकांची बुद्धी त्यांना सर्व प्रकारच्या हानीपासून सुरक्षित ठेवत आहे. मात्र काहीवेळा इतरांशी अहंकाराचा संघर्ष केलेले काम खराब होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात तुम्हाला ती सर्व छोटी-छोटी कामं करावी लागतील जी तुम्ही आत्तापर्यंत करताना कचरत होत्या. नोकरीमध्ये सध्या परिस्थिती अनुकूल नाही, सध्या तुम्ही फक्त मेहनतीवर लक्ष केंद्रित करा आणि परिणामांबद्दल जास्त विचार करु नका. सरकारी नोकरी करणाऱ्यांचे टार्गेट वाढणार आहे. व्यवसायात अचानक लाभ होण्याची शक्यता आहे, तर काही मोठ्या नियोजनासाठी आर्थिक पैसा खर्च करावा लागणार आहे. भागीदारीत चालणाऱ्या व्यवसायात महिन्याच्या सुरुवातीला चांगली वाढ होणार आहे. ज्या तरुणांनी काही कारणास्तव आपला अभ्यास अपूर्ण सोडला आहे किंवा अभ्यासक्रम चुकला आहे त्यांनी यावेळी पुन्हा अर्ज करावा. जमीन आणि घराशी संबंधित प्रकरणांमध्ये चांगली माहिती मिळण्याची शक्यता आहे. हृदयरोग्यांनी स्वत:ची विशेष काळजी घ्यावी आणि तणाव आणि अस्वस्थ खाण्याच्या सवयींपासून दूर राहावे.  

12/12

मीन (Pisces September 2024 )

सप्टेंबर महिन्यात मीन राशीच्या लोकांनी इतरांच्या प्रभावाखाली येऊ नये कारण बाहेरून चांगले दिसल्याने लोक तुमची फसवणूक करू शकतात. तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या खंबीर ठेवावे. नोकरीत चढ-उतार असणार आहे. महिन्याची सुरुवात चांगली होईल पण त्यानंतर परिस्थिती थोडी कठीण होणार आहे. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ऑफिसमधील तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले वागा, तेच तुम्हाला अडचणीतून बाहेर काढणार आहे. जाणकार आणि उच्च अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला जाणार आहे. हॉटेल व्यवस्थापन आणि पोलीस विभागात काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळणार आहे. तुमचे नाव प्रमोशनमध्ये असणार आहे. व्यावसायिकांनी आपल्या भागीदारांशी समन्वय साधून काम करा. नफा मिळविण्यासाठी, रिअल इस्टेट व्यावसायिकांना प्रथम सरकारी काम मजबूत ठेवावे लागेल. जमीन, घर खरेदीचे नियोजन होईल. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)