'या' देशांमध्ये विकलं जातंय स्वस्त पेट्रोल
पेट्रोल- डिझेलच्या दरात फरक
मुंबई : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कच्चा तेलांच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या दरम्यान भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात नागरिकांना कोणताच दिलासा मिळत नाही. याउलट सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरात एक्साइज ड्यूटी वाढवत आहे. केंद्र सरकारने भारतात पेट्रोलवर १० रुपये आणि डिझेलच्या दरात १३ रुपयांनी एक्साइज ड्यूटीमध्ये वाढ केली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा भाव हा ७१.२६ रुपये आणि डिझेलचा दर ६९.३९ रुपये प्रती लीटर आहे. पण देशात सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कुठे मिळणार हे आपण आता पाहणार आहोत.