भारतात या इलेक्ट्रीक कारसाठी बुकिंग सुरु, एका किलोमीटरसाठी फक्त 50 पैसे खर्च

Mar 16, 2021, 17:35 PM IST
1/5

Strom Motors ने STROM R3 साठी Booking Amount फक्त 10 हजार ठेवली आहे. या कारची किंमत 4.5 लाख रुपये आहे.

2/5

STROM R3 आधुनिक तंत्र वापरून तयार केली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, याचं मायलेज 40 पैसे प्रति किलोमीटर असेल. याचा अर्थ असा की, कारचा खर्च हा टूव्हीलर पेक्षा कमी असेल.

3/5

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती यामुळे आता लोकांना इलेक्ट्रिक गाड्यांकडे कल वाढत आहे. STROM R3 फुल रेंज 200 किलोमीटर आहे. ही कार 3 तासात पूर्ण चार्ज होते. STROM R3 ची फुल स्पीड 80 किलोमीटर प्रति तास आहे.

4/5

STROM R3 च्या बॅटरीवर कंपनी 3 वर्षाची किंवा 1 लाख किलोमीटरची वॉरंटी देत आहे.

5/5

Strom मोटर्सची सुरुवात 2016 मध्ये प्रतीक गुप्ता आणि जिएन-लुक अबाजिऊ यांनी केली होती. STROM R3 साठी आता दिल्ली एनसीआर आणि मुंबईमध्ये बुकिंग सुरु झाली आहे. STROM मोटर्सची फॅक्ट्री उत्तराखंडच्या काशीपूर येथे आहे. जेथे 500 हून अधिक गाड्या बनवल्या जातात.