देशातील 11 प्रसिद्ध मशिद; सुंदर कारागिरी, स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना

भारत प्रत्येक धर्माच्या ऐतिहासिक वास्तूंनी भरलेला आहे. भारतील देवळांप्रमाणेच मशिदी देखील तितक्या सुंदर आहेत. अनेक मशिदी या सुंदर कारागिरी, स्थापत्य आणि कलात्मकतेसाठी ओळखल्या जातात.त्यामुळे वर्षभर पर्यटक येथे येत असतात.

| Jul 21, 2023, 17:09 PM IST

most popular mosques in India: भारत प्रत्येक धर्माच्या ऐतिहासिक वास्तूंनी भरलेला आहे. भारतील देवळांप्रमाणेच मशिदी देखील तितक्या सुंदर आहेत. अनेक मशिदी या सुंदर कारागिरी, स्थापत्य आणि कलात्मकतेसाठी ओळखल्या जातात.त्यामुळे वर्षभर पर्यटक येथे येत असतात.

1/12

देशातील 11 प्रसिद्ध मशिद; सुंदर कारागिरी, स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना

most popular mosques in India 11 Beautiful craftsmanship a masterpiece of architecture

most popular mosques in India: भारत प्रत्येक धर्माच्या ऐतिहासिक वास्तूंनी भरलेला आहे. भारतील देवळांप्रमाणेच मशिदी देखील तितक्या सुंदर आहेत. अनेक मशिदी या सुंदर कारागिरी, स्थापत्य आणि कलात्मकतेसाठी ओळखल्या जातात.त्यामुळे वर्षभर पर्यटक येथे येत असतात.

2/12

जामा मशीद, जुनी दिल्ली

most popular mosques in India 11 Beautiful craftsmanship a masterpiece of architecture

दिल्लीची जामा मशीद ही भारतातील सर्वात मोठ्या आणि जुन्या मशिदींपैकी एक आहे. ही आलिशान मशीद शाहजहानने बांधली होती. ही मोठी मशीद 1650 ते 1656 या काळात बांधली गेली. ही मशीद मुघल काळातील अतिशय सुंदर कलात्मक शैलीत बांधली गेली आहे.

3/12

मक्का मशीद, हैदराबाद

most popular mosques in India 11 Beautiful craftsmanship a masterpiece of architecture

मक्का मशीद ही हैदराबादमधील सर्वात जुन्या मशिदींपैकी एक आहे आणि देशातील सर्वात मोठ्या मशिदींमध्ये गणली जाते. मुहम्मद कुली कुतुबशाहने 16व्या शतकात ही मशीद बांधली.

4/12

ताज-उल-मशीद, भोपाळ

most popular mosques in India 11 Beautiful craftsmanship a masterpiece of architecture

भोपाळची ताज-उल-मशीद ही भारतातील सर्वात जुन्या मशिदींपैकी एक आहे. देशातील सर्वात मोठी मशीद होण्याचा मानही तिला मिळाला आहे. या आलिशान मशिदीची रचना अतिशय आकर्षक आणि भव्य आहे.

5/12

हाजीआली दर्गा, मुंबई

most popular mosques in India 11 Beautiful craftsmanship a masterpiece of architecture

मुंबई या आर्थिक शहराच्या दक्षिणेत असलेल्य वरळीत हा दर्गा आहे. समुद्रकिनाऱ्यावरील लहानशा बेटावर अतिशय प्रतिष्टीत आणि प्रसिद्ध ठिकाणी हाजी अली दर्गा आहे. हाजी आली दर्गा हा एक इंडो – इस्लामिक वास्तु कलेचा आदर्श सुंदर नमूना आहे. 

6/12

बारा इमामबारा, लखनौ

most popular mosques in India 11 Beautiful craftsmanship a masterpiece of architecture

लखनौमध्ये स्थित बारा इमामबारा आसिफ इमामबारा म्हणूनही ओळखला जातो कारण तो 1783 मध्ये लखनौच्या नवाब असफ-उद-दौलाने बांधला होता. बारा इमामबारा ही भारतातील सर्वात उत्कृष्ट इमारतींपैकी एक आहे.

7/12

जामा मशीद, आग्रा

most popular mosques in India 11 Beautiful craftsmanship a masterpiece of architecture

ही मशीद 1648 मध्ये मुघल सम्राट शाहजहानने आपली आवडती मुलगी जहांआरा बेगम हिच्या स्मरणार्थ बांधली होती. ही मशीद आग्राच्या मुख्य आकर्षणांपैकी एक आहे.

8/12

जमाली आणि कमाली मशीद, दिल्ली

most popular mosques in India 11 Beautiful craftsmanship a masterpiece of architecture

ही मशीद दिल्लीतील मेहरौली येथे आहे. सोळाव्या शतकातील सुफी संत जमाली आणि कमालीच्या कबरी येथे आहेत. सुफी संत जमाली हे लोधी राजवटीचे राज्यकर्ते होते. यानंतर बाबर आणि त्याचा मुलगा हुमायून यांच्या राजवटीपर्यंत जमालीकडे खूप लक्ष देण्यात आले. जमालीच्या थडग्याचे बांधकाम हुमायूनच्या काळात पूर्ण झाल्याचे मानले जाते. जमाली कमाली मशीद १५२८-२९ मध्ये बांधली गेली.

9/12

अधाई दिन का झोपरा, अजमेर

most popular mosques in India 11 Beautiful craftsmanship a masterpiece of architecture

अधाई दिन का झोपरा ही मशीद आहे ज्याच्या मागे एक मनोरंजक कथा आहे. ही वास्तू अडीच दिवसांत बांधली गेल्याचे मानले जाते. ही इमारत मूळची संस्कृत शाळा होती जिचे 1198 मध्ये मोहम्मद घोरीने मशिदीत रूपांतर केले. ही मशीद एका भिंतीने वेढलेली आहे. ज्याला 7 कमानी आहेत, ज्यावर कुराणचे श्लोक लिहिलेले आहेत.

10/12

जामा मशीद, अजमेर

most popular mosques in India 11 Beautiful craftsmanship a masterpiece of architecture

पांढऱ्या संगमरवरी बनलेली ही मशीद शाहजहानने बांधली होती. ही मशीद तीन भागात विभागलेली आहे.

11/12

नगीना मशीद, आग्रा

most popular mosques in India 11 Beautiful craftsmanship a masterpiece of architecture

आग्रा किल्ल्यातच नगीना मशीद आहे, जी दरबारातील महिलांसाठी बांधली गेली होती.त्याच्या आत जनाना मीना बाजार होता, ज्यामध्ये फक्त महिलाच वस्तू विकत असत.

12/12

हजरतबल मशीद, जम्मू आणि काश्मीर

most popular mosques in India 11 Beautiful craftsmanship a masterpiece of architecture

हजरतबल मशीद दल सरोवराच्या पश्चिमेला वसलेली आहे आणि मुस्लिमांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. ही मशीद मदिनत-अस-सानी, असर-ए-शरीफ आणि दर्गा शरीफ अशा अनेक नावांनी ओळखली जाते. ही मशीद पांढऱ्या संगमरवरी बनलेली असून ती हुबेहुब हिमालय पर्वतराजीच्या पार्श्वभूमीसारखी दिसते.