वयाच्या 19 व्या वर्षी 6 मुलांची 'आई'! 2 वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होती 'ही' अभिनेत्री, दोन घासही मिळणं कठीण झालेलं

Entertainment News : ही अभिनेत्री 2 वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होती. एवढंच नाही एकेकाळी तिच्याकडे खायला देखील पैसे नव्हते. तर वयाच्या 19 व्या वर्षी ती 6 मुलांची आई होती. 

Aug 11, 2023, 08:25 AM IST

Shafaq Naaz Career Journey : मनोरंजन क्षेत्रात अभिनेते आणि अभिनेत्रीला प्रसिद्ध पूर्वी अनेक संघर्षांचा सामना करावा लागतो. अशाच एका लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री कहाणी अतिशय संघर्षमय होती. मुंबईत तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. 

1/11

ही अभिनेत्री आहे शफाक नाझ. ती आणि तिची बहिणी फलक या दोघींनीही सुरुवातीच्या काळात खूप वाईट दिवस पाहिले. 

2/11

आपल्या संघर्षांच्या दिवसांबद्दल बोलताना ती म्हणाली की, मी आणि माझ्या बहिणीने खूप चढ उतार पाहिले आहेत. आम्ही दोघी एकत्र मुंबईत आलो. त्यावेळी माझी बहीण माझ्यासबोत नसती तर मी मुंबईत राहूच शकली नसती. 

3/11

त्या कठीण काळात ती माझी ताकद होती. एक काळ असा होता की, आमच्याकडे जेवणासाठीही पैसे नव्हते. 

4/11

आम्ही मास्टरजींकडे (सरोज खान) जायचो. तेव्हा वेळी आमच्यासोबत घरात बनवलेले पोहे असायचे . जेव्हा कधी भूक लागायची आम्ही ते पोहो खायचो.

5/11

अनेक ठिकाणी ऑडिशनलाही जायचो. अनेक संघर्ष आम्ही पाहिले आहेत. त्यावेळी शीजन अगदी लहान होता. 

6/11

एक वेळ अशी पण आली मी 6 मुलांची आई झाली. झालं असं की, मी जेव्हा महाभारतसाठी काम करायचं ठरवलं. तेव्हा मला वयाच्या 19-20 व्या वर्षी तू 6 मुलांच्या आईची भूमिका करावी लागली.

7/11

अनेकांनी मला या निर्णयाला विरोध केला. एवढी मोठी रिस्क कोणी घेणार नाही.   

8/11

जेव्हा मी कुंतीला पाहते तेव्हा मी या भूमिकेला आईच्या नजरेतून पाहू शकते. महाभारतचा तो प्रवास माझ्यासाठी इमोशनल आहे. 

9/11

 शफाक तिच्या आजी आणि मामासोबत लहानाची मोठी झाली. आजीच्या निधनानंतर ती दोन वर्षे नैराश्याच्या दुनियेत हरवली होती. ती आजीला अम्मी म्हणायची 

10/11

तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 2010 मध्ये तिने इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात तिने एपिसोडिक भूमिका केल्या. 

11/11

 त्यानंतर महाभारतात तिला महत्त्वाची भूमिका मिळाली. या शोमध्ये तिने कुंतीची भूमिका साकली होती.