Mukesh Ambani : मुकेश अंबानींच्या तिन्ही व्याहींपैकी कोण आहे सगळ्यात श्रीमंत? पाहा PHOTO

Mukesh Ambani  :  आशियातील सर्वात श्रीमंत आणि मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याबद्दल कोणाला माहिती नाही असं कोणी नाही. पण त्यांचे तीन व्याही काय करतात आणि कोण किती श्रीमंत आहे तुम्हाला माहिती आहे का?   

Feb 20, 2023, 08:34 AM IST

Russell Mehta Ajay Piramal Viren Merchant Networth : रिलायंस इंडस्ट्रीज (Reliance Industries) चे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी महाशिवत्रीनिमित्त (#ShivajiMaharaj) भगवान शंकराची आराधना केली. मुलगा आकाश अंबानीसोबत (akash ambani) त्यांनी सोमनाथ मंदिरात पूजाअर्चा केली. भगवान शिवाला अभिषेक केला. यावेळी त्यांनी सोमनाथ मंदिर ट्रस्टला 1.51 कोटी रुपयांची देणगीही दिली. फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती $82.6 अब्ज झाली आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांची ख्याती आहे. मग अशा श्रीमंत व्यक्तीचे व्याही काय करतात आणि कोण किती श्रीमंत आहे तुम्हाला माहिती आहे का? (Mukesh Ambani Arun Russell Mehta Ajay Piramal Viren Merchant Networth radhika merchant shloka mehta Anand Piramal isha ambani akash ambani anant ambani trending photo)

1/6

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल

isha ambani

ईशा अंबानी (isha ambani) हिच आनंद पिरामल (Anand Piramal) यांच्यासोबत 12 डिसेंबर 2018 ला लग्न झालं. त्यांना कृष्णा आणि आदिया अशी दोन जुळी मुलं आहेत. ईशा नुकतीच तिच्या बालपणीची मैत्रीण कियारा अडवाणीच्या (Kiara Advani Marriage) लग्नासाठी जयपूरला गेली होती. 

2/6

अजय पिरामल

Ajay Piramal

ईशा अंबानीचे सासरे आणि मुकेश अंबानी यांचे व्याही अजय पिरामल (Ajay Piramal) फार्मास्यूटिकल्स आणि हेल्थकेयर सेक्टरमध्ये नावाजलेले एक नाव आहे.  पीरामल एंटरप्राइजेज फार्मास्युटिकल ही प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक आहे. फोर्ब्सनुसार अजय पिरामल (Ajay Piramal Networth) यांची एकूण संपत्ती 24,825 कोटी रुपये आहे.

3/6

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता

akash ambani

मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (akash ambani) याचं लग्न श्लोका मेहताशी (shloka mehta) 2019 मध्ये झालं. त्यांचा मुलाचं नाव पृथ्वी आहे. हे दोघे नुकतेच मुंबईत कियारा अडवाणी आणि सिद्धार्थच्या रिसेप्शनला दिसले होते. 

4/6

अरुण रसेल मेहता

Arun Russell Mehta

श्लोका मेहताचे वडील अरुण रसेल मेहता (Arun Russell Mehta ) हे देशातील प्रमुख हिरे व्यापाऱ्यांपैकी एक आहेत. ते रोझी ब्लू कंपनीचे एमडी आहेत. देशभरात त्यांचा 12 कंपन्या आहेत. मेहता यांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर. त्यांची एकूण संपत्ती (Arun Russell Mehta Networth) 3000 कोटी रुपये आहे. 

5/6

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट

anant ambani

गेल्या महिन्यात 19 जानेवारी 2023 ला मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (anant ambani ) आणि राधिका मर्चंट (radhika merchant) यांचा मुंबईत मोठ्या थाट्यामाट्यात साखरपुडा पार पडला. 

6/6

वीरेन मर्चंट

Viren Merchant

राधिका मर्चंटचे वडील वीरेन मर्चंट (Viren Merchant ) हे एनकोर हेल्थकेअर कंपनीचे सीईओ आहेत. त्यांची एकूण संपत्ती 755 कोटींच्या (Viren Merchant Networth) घरात आहे.