IND vs WI: वयाच्या 29 व्या वर्षी 'हा' खेळाडू करणार टीम इंडियामध्ये डेब्यू; भलेभले फलंदाज घाबरले!

India vs West Indies:  देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या स्टार खेळाडूंना भारतीय कसोटी संघात संधी मिळाली आहे.

Jul 04, 2023, 12:46 PM IST

India vs West Indies Test Series:  टीम इंडिया येत्या 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या स्टार खेळाडूंना भारतीय कसोटी संघात संधी मिळाल्याने आता त्यांच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.

1/5

दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज

वेस्ट इंडिज मालिकेसाठी रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना स्थान देण्यात आलंय. अशातच एका दिल्ली कॅपिटल्सच्या एका नवख्या गोलंदाजाला देखील संघात स्थान देण्यात आलंय.

2/5

मुकेश कुमार

येत्या 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडिया डॉमिनिका येथे पोहोचली आहे. या मालिकेसाठी सराव करताना एका गोलंदाजावर सर्वांच्या नजरा आहेत. त्याचं नाव मुकेश कुमार.

3/5

पदार्पणाची संधी

भारत आणि वेस्ट इंडिज कसोटी मालिकेसाठी मुकेश कुमार या 29 वर्षीय खेळाडूला पदार्पणाची संधी मिळू शकते. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघात निवड झाली आहे.

4/5

टेस्ट सामन्यात संधी?

बिहारच्या गोपालगंज येथील रहिवासी असलेल्या मुकेश कुमार यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. मात्र त्याच्या संघर्षामुळे त्याने टीम इंडियापर्यंतचा प्रवास केला आहे. अशातच आता त्याला टेस्ट सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.

5/5

कशी असेल टीम इंडिया?

कशी असेल टीम इंडिया? रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.