Mumbai Water Crisis: बापरे! मान्सूननं पुढील 48 तासात जोर धरला नाही तर मुंबईवर भीषण पाणीसंकट

Mumbai Water Crisis: वाढत्या तापमानामुळे मुंबईवर पाणी संकटाची दाट शक्यता दिसून येत आहे. यामागे कारण ठरत आहे तो म्हणजे मान्सूनचा मंदावलेला वेग आणि शहरावर झालेली पावसाची अवकृपा.हवामान विभागाच्या माहितीनुसार शहरात पुढील 24 तासांमध्ये पावसाची चिन्हं नसून, येत्या 48 तासांमध्ये ही परिस्थित न सुधारल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.   

Jun 17, 2024, 17:19 PM IST
1/7

5.42 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक

Mumbai Water Supply shortage : पालिकेने रविवारी सकाळी केलेल्या नोंदीनुसार मुंबईला पाणापुरवठा करणाऱ्या 'या' धरणांमध्ये फक्त 5.42 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तर हा पाणीसाठा 20 जुलै पर्यंत पुरेल इतकाच आहे.   

2/7

मुंबईवर पाणीटंचाईची समस्या

पुढील काही दिवसात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे मात्र अपेक्षेनुसार पावसाने हजेरी नाही लावली तर मुंबईवर पाणीटंचाईची समस्या गडद होण्याची शक्यता आहे.   

3/7

सात धरणात किती टक्के पाणीसाठा उपलब्ध?

  अप्पर वैतरणा - मुंबईमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणामध्ये केवळ 0 टक्के पाणीच असल्याच दिसून आले आहे.   मोडक सागर  - मुंबईतील मोडक सागर धरणामध्ये फक्त15.87 टक्के उपलब्ध आहे.

4/7

तानसा  -   तानसा येथील पाण्याची पातळी 22.29 टक्के एवढीच उपलब्ध आहे. मध्या वैतरणा -  मध्या वैतरणा धरणामध्ये केवळ 9.63 टक्के उपलब्ध आहे.

5/7

भातसा  - भातसा धरणामध्ये सर्वाधिक कमी पाणीसाठा 0 टक्के असल्याचे दिसून आले   विहार  - विहार धरणामध्ये 18.35 टक्के पाणीसाठा  उपलब्ध आहे. तुळसी  - तुळसी  धरणामध्ये 24.66 टक्के पाणीसाठा  उपलब्ध आहे.  

6/7

मुंबई शहराला दर दिवशी 3850 दशकलाश लिटर इतक्या पाण्याची गरज आहे तर, ठाणे भिवंडी महापालिकेची पाण्याची गरज 150 दशलक्ष लिटर इतकी आहे.   

7/7

सध्या एकूण सात तलावांमध्ये निदान पावसाळ्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच 1 ऑक्टोबर पर्यंत भरलेलं असणं गरजेचं आहे. असं असलं तरीही मान्सूननं जोर न धरल्यास मात्र हे संकट आणखी गडद होण्यास वेळ लागणार नाही.