मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलमुळे सागरी व्यापार वाढणार, तरुणांना हजारो नव्या रोजगाराच्या संधी

International Cruise: 2022-23 मध्ये जेएनपीटी हे जगातील शीर्ष 30 बंदरांपैकी एक राहिले आहे. त्याचवेळी मुंबई बंदराच्या क्रूझ टर्मिनलवरून शेकडो विदेशी पर्यटक येथे दाखल झाले.

| Oct 18, 2023, 10:19 AM IST

Mumbai International Cruise: महाराष्ट्राला सुमारे 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्रकिनाऱ्याचा योग्य वापर करून व्यापाराला चालना देण्याबरोबरच वाहतुकीसाठी नवीन मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. 

1/9

मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलमुळे सागरी व्यापार वाढणार, तरुणांना हजारो नव्या रोजगाराच्या संधी

Mumbai International Cruise Terminal port built in Palghar Employment Opportunity

Mumbai International Cruise: जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडून मुंबईजवळ पालघरमधील वाढवण येथे  बंदर बांधण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. यासाठी 61 हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

2/9

3 कंपन्यांसोबत सामंजस्य करार

Mumbai International Cruise Terminal port built in Palghar Employment Opportunity

वाढवण येथील बंदर तयार करण्यासाठी 3 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला असून बंदरात प्रत्येकी 1 किलोमीटरचे एकूण 9 टर्मिनल असतील, अशी माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे.

3/9

नवीन रोजगाराच्या संधी

Mumbai International Cruise Terminal port built in Palghar Employment Opportunity

जेएनपीटीनंतर बंदर पूर्ण झाल्यामुळे राज्याला आर्थिक फायदा तर होणार आहे. यासोबतच हजारो नवीन रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. 

4/9

जगातील क्रूझ हब

Mumbai International Cruise Terminal port built in Palghar Employment Opportunity

भारत लवकरच जगातील क्रूझ हब होणार आहे, मुंबईत उभारल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलचे यात मोठे योगदान असणार आहे.

5/9

सागरी प्रकल्पांचे उद्घाटन

Mumbai International Cruise Terminal port built in Palghar Employment Opportunity

पंतप्रधानांनी 23 हजार कोटी रुपयांच्या सागरी प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. यावेळी त्यांनी ब्लू इकॉनॉमीची दीर्घकालीन ब्लू प्रिंट जारी केली. सुमारे 4,500 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणार्‍या टुना-टेकरा टर्मिनलची पायाभरणी गुजरातच्या दीनदयाळ बंदर प्राधिकरणात करण्यात आली आहे.

6/9

300 हून अधिक सामंजस्य करार

Mumbai International Cruise Terminal port built in Palghar Employment Opportunity

हे ग्रीनफिल्ड टर्मिनल सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) प्रक्रियेअंतर्गत विकसित केले जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी सागरी क्षेत्रातील जागतिक आणि राष्ट्रीय भागीदारीसाठी सुमारे 7.16 लाख कोटी रुपयांचे 300 हून अधिक सामंजस्य करार (एमओयू) केले.

7/9

दरवर्षी सुमारे 200 समुद्रपर्यटन अपेक्षित

Mumbai International Cruise Terminal port built in Palghar Employment Opportunity

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल 2024 पर्यंत प्रवाशांसाठी तयार होईल. या टर्मिनलवर दरवर्षी सुमारे 200 क्रूझ जहाजे येतील. त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

8/9

दोन बंदरे

Mumbai International Cruise Terminal port built in Palghar Employment Opportunity

सध्या राज्यात मुंबईतील मुंबई बंदर आणि नवी मुंबईत जेएनपीटी बंदर अशी दोन बंदरे आहेत. शहरापासून जवळच असल्याने मुंबई बंदरातून होणारा व्यापार खूपच कमी झाला आहे.

9/9

वाहतुकीसाठी नवीन मार्ग

Mumbai International Cruise Terminal port built in Palghar Employment Opportunity

महाराष्ट्राला सुमारे 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्रकिनाऱ्याचा योग्य वापर करून व्यापाराला चालना देण्याबरोबरच वाहतुकीसाठी नवीन मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे.