Mumbai local News : आठवड्याच्या मध्यावरच पश्चिम रेल्वेचा विशेष ब्लॉक; पाहा कुठे होणार खोळंबा

Mumbai local News : आता मात्र आठवड्याच्या मध्येच रेल्वेकडून विशेष ब्लॉक घेण्यात येत असल्यामुळं प्रवाशांचा खोळंबा होणार ही बाब निश्चित होताना दिसत आहे. 

Aug 16, 2023, 07:43 AM IST

Mumbai local News : मुंबई लोकलचा विषय निघाला आणि त्यातही रविवारच्या प्रवासाला निघायचं म्हटलं की आधी मेगाब्लॉक कोणत्या मार्गावर आहे हे आवर्जून पाहिलं जातं. 

1/7

पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक

Mumbai local train western railway block at dahanu road staion

Mumbai local News : आठवड्याच्या मध्यावर म्हणजेच 16 ऑगस्ट बुधवारी पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे. बुधवारी अनेक कार्यालयांना पारसी नूतन वर्षाची सुट्टी असली तरीही कार्यालयं मात्र इथं अपाद ठरत आहेत. अशा सर्व मंडळींना सुट्टी नसल्याचा मनस्ताप होत असतानाच त्यात आणखी भर पडली आहे ती म्हणजे प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेची. 

2/7

ट्रॅफिक ब्लॉक

Mumbai local train western railway block at dahanu road staion

डहाणू रोड रेल्वे स्थानकात बुधवारी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येत आहे. सकाळी 8 वाजून 50 मिनिटांपासून ते 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे हाताशी जास्तीचा वेळ ठेवून निघालेलं उत्तम ठरणार आहे 

3/7

30 मिनिटं उशिरानं धावेल

Mumbai local train western railway block at dahanu road staion

ब्लॉकच्या धर्तीवर चर्चगेट ते विरार आणि डहाणू रोड दरम्यान धावणाऱ्या काही लोकल फेऱ्या काही प्रमाणात रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाय गाडी क्रमांक 22956 भूज-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस 30 मिनिटं उशिरानं धावेल. तर, गाडी क्रमांक 22930 वडोदरा-डहाणू रोड एक्स्प्रेस तब्बल 45 मिनिटं उशिरानं धावणार आहे.   

4/7

अंधेरी-डहाणू रोड लोकल

Mumbai local train western railway block at dahanu road staion

सदर मार्गावर सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी सुटणारी अंधेरी-डहाणू रोड लोकल वाणगाव स्थानकापर्यंत धावेल.  

5/7

डहाणू रोड-अंधेरी लोकल

Mumbai local train western railway block at dahanu road staion

सकाळी 9 वाजून 37 मिनिटांनी निघणारी डहाणू रोड-अंधेरी लोकल वाणगाव ते विरार दरम्यान धावणार आहे.  

6/7

डहाणू रोड-विरार लोकल

Mumbai local train western railway block at dahanu road staion

सकाळी 10 वाजून 10 मिनिटांची डहाणू रोड-विरार लोकल वाणगाव ते विरार दरम्यानच धावेल. 

7/7

प्रवाशांनी नोंद घ्यावी

Mumbai local train western railway block at dahanu road staion

सकाळी 8 वाजून 49 मिनिटांची चर्चगेट-डहाणू रोड लोकल वाणगाव स्थानकापर्यंत धावेल. तर, सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी निघणारी डहाणू रोड ते विरार लोकल वाणगाव ते विरार दरम्यान धावणार आहे याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.