मुंबईतलं आयलॅंड! चारही बाजुने समुद्र, अत्यल्प रेंटवर मिळेल बंगला; अश्लील सिनेमांच्या शूटींगसाठी होता कुप्रसिद्ध

येथे अवघ्या 15 हजार रुपयांपासून तुम्ही बंगला भाड्याने घेऊ शकता.

| Jun 08, 2024, 13:57 PM IST

Mumbai Madh Island: येथे अवघ्या 15 हजार रुपयांपासून तुम्ही बंगला भाड्याने घेऊ शकता.

1/10

मुंबईतलं आयलॅंड! चारही बाजुने समुद्र, अत्यल्प रेंटवर मिळेल बंगला; अश्लील सिनेमांच्या शूटींगसाठी कुप्रसिद्ध

Mumbai Madh Island Shooting Location Rental Bungalow Tourism Marathi News

मड आयलॅंड हे समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले मुंबईचे बेट. छोट्या आणि नवीन चित्रपट निर्मात्यांची शूटिंगसाठी ही जागा पहिली पसंती ठरली आहे. याचे कारण म्हणजे येथे स्वस्तात शूटिंग लोकेशन्स उपलब्ध आहेत. 

2/10

जास्त पेपरवर्क नाही

Mumbai Madh Island Shooting Location Rental Bungalow Tourism Marathi News

येथे शूटींग करण्यासाठी निर्मात्यांना जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. तसेच खूप जास्त पेपरवर्क करावे लागत नाही. म्हणून आयलॅंडला सर्वाधिक पसंती मिळते.

3/10

15 हजार रुपयांपासून बंगला भाड्याने

Mumbai Madh Island Shooting Location Rental Bungalow Tourism Marathi News

येथे अवध्या 15 हजार रुपयांपासून तुम्ही बंगला भाड्याने घेऊ शकता. ते अगदी 2 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला बंगला भाड्याने मिळेल. एका दिवसासाठीदेखील तुम्हाला येथे बंगले भाड्याने उपलब्ध आहेत. बंगल्यात शूटिंग केल्यास वेगळा सेट बांधावा लागत नाही. त्यामुळे अनेक चित्रपट आणि शोचे शूटींग येथे झाले आहे. 

4/10

अनेक चित्रपटांचे शूटींग

Mumbai Madh Island Shooting Location Rental Bungalow Tourism Marathi News

क्राईम पेट्रोल, सावध इंडिया आणि सीआयडी यांसारख्या टीव्ही शोचे बहुतांश शूटिंग मड आयलंडमध्ये झाले आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांचा चित्रपट मर्द, अक्षय कुमारचा चित्रपट लक्ष्मी बॉम्ब, कबीर सिंग, सिंघम रिटर्न आणि फिर हेरा फेरी अशा अनेक चित्रपटांचे शूटींग येथे झाले आहे.

5/10

पॉर्न रॅकेटचा पर्दाफाश

Mumbai Madh Island Shooting Location Rental Bungalow Tourism Marathi News

लॉकडाऊन दरम्यान, मड आयलंड देखील वेगळ्या कारणाने चर्चेत होते. मुंबई क्राईम ब्रँचने येथे पॉर्न रॅकेटचा पर्दाफाश केला होता. क्राईम ब्रँचच्या पथकाने मड आयलंड येथील एका बंगल्यावर छापा टाकला होता. 

6/10

ॲडल्ट कंटेंट बनवले जात असल्याचे उघड

Mumbai Madh Island Shooting Location Rental Bungalow Tourism Marathi News

या छाप्यात येथे चित्रपटांच्या नावाखाली ॲडल्ट कंटेंट बनवले जात असल्याचे उघड झाले. याच प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचेही नाव पुढे आले होते. त्यामुळे इथली जागा कुप्रसिद्ध झाली होती. 

7/10

कसे जायचे?

Mumbai Madh Island Shooting Location Rental Bungalow Tourism Marathi News

मुंबईतील अंधेरी पश्चिम भागातील वर्सोवा येथून जेटीद्वारे येथे पोहोचता येते. बस क्रमांक 271 मालाड रेल्वे स्थानकावरून जाते, हे देखील प्रवासाचे एक चांगले साधन आहे. याशिवाय 269 क्रमांकाची बस बोरिवलीहून जाते, या मार्गावरूनही जाता येते.

8/10

जेट्टी मार्गे

Mumbai Madh Island Shooting Location Rental Bungalow Tourism Marathi News

खासगी वाहनाने जायचे असल्यास लिंक रोडने मालवणी मार्गे मड आयलंडला जाता येते. तसेच वर्सोवा जेट्टी मार्गे तुम्ही लवकर येथे पोहोचू शकता आहे. त्यानंतर तेथून फेरीबोटीने प्रवास करावा लागतो. ज्या प्रवासाला तुम्हाला तास लागेल तिथे काही मिनिटात तुम्ही बोटीने पोहोचू शकतात. 

9/10

सेलिब्रिटींच्या हे आवडीचे ठिकाण

Mumbai Madh Island Shooting Location Rental Bungalow Tourism Marathi News

अनेक सेलिब्रिटींच्या हे आवडीचे ठिकाण आहे. मड आयलंडमध्ये मिथुन चक्रवर्ती, शक्ती कपूर आणि अर्चना पूरण सिंग यांसारख्या मोठ्या सेलिब्रिटींचे बंगले आणि फ्लॅट्सही आहेत. 

10/10

सेलिब्रिटींनाही पडली भूरळ

Mumbai Madh Island Shooting Location Rental Bungalow Tourism Marathi News

पूर्वी सेलिब्रिटी मुंबईपासून कित्येक किलोमीटर दूर जमीन खरेदी करायचे. लोणावळा आणि पनवेलसारख्या ठिकाणी फार्महाऊस बांधायचे. आता हळूहळू त्याचा कल मड आयर्लॅंडकडे वळू लागल्याचे म्हटले जाते.