मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, प्रवास जलद होण्यासाठी मोनोरेल प्रशासनाचा मोठा निर्णय

 मुंबईत मोनोने प्रवास करण्यासाठी प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी आता कमी झाला आहे. 18 मिनिटांऐवजी आता दर 15 मिनिटांनी मोनो सेवा उपलब्ध होणार आहे.

| Nov 13, 2023, 11:33 AM IST

Mumbai Mono Rail: मुंबईत मोनोने प्रवास करण्यासाठी प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी आता कमी झाला आहे. 18 मिनिटांऐवजी आता दर 15 मिनिटांनी मोनो सेवा उपलब्ध होणार आहे.

1/11

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, प्रवास जलद होण्यासाठी मोनोरेल प्रशासनाचा मोठा निर्णय

Mumbai Mono Rail Metropolitan Region Development Authority MMRDA extend mono ferries

Mumbai Mono Rail: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मोनो ट्रेनमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाला पण आता या प्रवासाचे अंतर आणखी कमी होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आपल्या गंतव्यस्थानी वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे. 

2/11

दर 15 मिनिटांनी मोनो सेवा

Mumbai Mono Rail Metropolitan Region Development Authority MMRDA extend mono ferries

मुंबईत मोनोने प्रवास करण्यासाठी प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी आता कमी झाला आहे. 18 मिनिटांऐवजी आता दर 15 मिनिटांनी मोनो सेवा उपलब्ध होणार आहे.

3/11

अतिरिक्त 24 फेरी

Mumbai Mono Rail Metropolitan Region Development Authority MMRDA extend mono ferries

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए)ही मोनो फेरी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मोनोच्या 20 किमी मार्गावर अतिरिक्त 24 फेरी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

4/11

मोनो ट्रेनच्या 118 फेऱ्या

Mumbai Mono Rail Metropolitan Region Development Authority MMRDA extend mono ferries

आतापर्यंत मोनो मार्गावर प्रवाशांसाठी मोनो ट्रेनच्या 118 फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या, त्या आता 142 फेऱ्या करण्यात आल्या आहेत. मोनोच्या ताफ्यात आणखी ट्रेन सामील होणार असल्या तरी ही कोणती नवी ट्रेन नाही.

5/11

गाडी बराच काळ काशेडमध्ये

Mumbai Mono Rail Metropolitan Region Development Authority MMRDA extend mono ferries

तांत्रिक बिघाडामुळे मोनो ट्रेन प्रवाशांच्या सेवेतून मागे घेण्यात आल्या होत्या. ही गाडी बराच काळ काशेडमध्ये उभी होती. एमएमआरडीएने ट्रेनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून त्याचा पुनर्वापर सुरू केला आहे.

6/11

प्रतिसाद मिळेना

Mumbai Mono Rail Metropolitan Region Development Authority MMRDA extend mono ferries

2014 मध्ये मुंबईत मोनो सेवा सुरू करण्यात आली होती. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक (सात मार्ग) दरम्यान मोनोरेल कार्यरत आहे. उत्तम कनेक्टिव्हिटीअभावी मोनोला सुरुवातीपासूनच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत नाही.

7/11

विविध कारणांमुळे चर्चेत

Mumbai Mono Rail Metropolitan Region Development Authority MMRDA extend mono ferries

मुंबई मोनोरेलही अनेकदा रेकचा तुटवडा, डब्यांना आग लागणे आणि मध्यभागी गाड्या थांबवणे यामुळे चर्चेत असते.

8/11

ताफ्यात 10 नवीन गाड्या

Mumbai Mono Rail Metropolitan Region Development Authority MMRDA extend mono ferries

गाड्यांच्या कमतरतेमुळे प्रवाशांना 18 मिनिटे स्थानकावर थांबावे लागले. मोनोच्या या समस्येवर मात करण्यासाठी मोनोच्या ताफ्यात 10 नवीन गाड्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

9/11

नवीन मोनो ट्रेन

Mumbai Mono Rail Metropolitan Region Development Authority MMRDA extend mono ferries

ट्रेनची देखभाल सुलभ व्हावी यासाठी देशातच नवीन मोनो ट्रेन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

10/11

नवीन मेट्रो मार्गाला जोडणार

Mumbai Mono Rail Metropolitan Region Development Authority MMRDA extend mono ferries

मोनोकडे अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोनोला रेल्वे स्थानकाशी जोडण्याची योजना आखण्यात आली आहे आणि नवीन मेट्रो मार्ग बांधला जात आहे.

11/11

मोनो प्रवाशांची संख्या वाढेल

Mumbai Mono Rail Metropolitan Region Development Authority MMRDA extend mono ferries

मेट्रो आणि लोकल ट्रेनशी कनेक्ट झाल्यानंतर मेट्रो आणि रेल्वे प्रवासी देखील मोनो वापरण्यास सुरुवात करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.