मुंबईच्या पोटातून जाणार मल्टी मॉडेल बोगदा, ट्रॅफिकपासून कायमची होणार सुटका

Mumbai Underground Multi Model Tunnel: मुंबईबाहेर जाणाऱ्या वाहनांना शहरातील रस्त्यावर जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे.

| Oct 14, 2023, 12:38 PM IST

Mumbai Underground Multi Model Tunnel: एमएमआरशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी इंटिग्रेट मास्टर प्लॅन तयार केला जाईल. कोस्टल रोड, ईस्टर्न फ्रीवे, वेस्टर्न एक्स्प्रेस वे, ईस्टर्न एक्स्प्रेस वे यासह अन्य कनेक्टिव्हिटी भविष्यात बांधल्या जाणाऱ्या भूमिगत बोगद्याशी जोडल्या जाणार आहेत.

1/11

मुंबईच्या पोटातून जाणार मल्टी मॉडेल बोगदा, ट्रॅफिकपासून कायमची होणार सुटका

Mumbai Underground Multi Model Tunnel Relief from Traffic jam connectivity with MMR

Mumbai Multi Model Tunnel: रोजच्या ट्रॅफिक जामला कंटाळलेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिका आणि युरोपप्रमाणे आता मुंबईतही भूमिगत मल्टी मॉडेल बोगद्यांचे जाळे टाकण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांना वाहतूककोंडीतून दिलासा मिळेल. तसेच मुंबई मेट्रोपोलियन रिजनशी संपर्कही वाढेल.

2/11

8 सदस्यीय समिती स्थापन

Mumbai Underground Multi Model Tunnel Relief from Traffic jam connectivity with MMR

मुंबईतील मल्टी-मॉडेल बोगद्याचे स्वरूप ठरवण्यासाठी बीएमसी आयुक्त आय.एस. चहल यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी बोगद्याच्या बांधकामाची संपूर्ण रूपरेषा तयार करून ती 6 महिन्यांत शासनाला सादर केली जाणार आहे.

3/11

वाहतूक व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची

Mumbai Multi Model Tunnel Relief from Traffic jam connectivity with MMR

या प्रकल्पामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था आंतरराष्ट्रीय दर्जाची होणार आहे. हा बोगदा मुंबईत अनेक टप्प्यात बांधला जाणार आहे. मुंबईतील वाहतूक समस्येतून सुटका करण्यासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे.

4/11

इंटिग्रेट मास्टर प्लॅन

Mumbai Underground Multi Model Tunnel Relief from Traffic jam connectivity with MMR

हा प्रकल्प पुढील 30 वर्षांचा विचार करून तो तयार केला जाणार आहे. एमएमआरशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी इंटिग्रेट मास्टर प्लॅन तयार केला जाईल. कोस्टल रोड, ईस्टर्न फ्रीवे, वेस्टर्न एक्स्प्रेस वे, ईस्टर्न एक्स्प्रेस वे यासह अन्य कनेक्टिव्हिटी भविष्यात बांधल्या जाणाऱ्या भूमिगत बोगद्याशी जोडल्या जाणार आहेत., जेणेकरून वाहने द्रुतगती मार्गावरील बोगद्यातून थेट त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचू शकतील.

5/11

थेट मुंबईबाहेर

Mumbai Multi Model Tunnel Relief from Traffic jam connectivity with MMR

मुंबईबाहेर जाणाऱ्या वाहनांना शहरातील रस्त्यावर जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे.

6/11

वाहतूक कोंडीची समस्या

Mumbai Multi Model Tunnel Relief from Traffic jam connectivity with MMR

शहरात येणारी वाहने रस्त्यावरून इतर भागात जातात. त्यामुळे मुंबईकरांना रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. भूमिगत मल्टी-मॉडल बोगद्यामुळे ही समस्या सुटण्याची शक्यता आहे. 

7/11

समितीला सूचना

Mumbai Multi Model Tunnel Relief from Traffic jam connectivity with MMR

ही समिती मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी बोगदे बांधण्याची ठिकाणे ओळखणार आहे. त्याअंतर्गत ज्या ठिकाणी जास्त रहदारी असेल त्या जागेला प्राधान्य दिले जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत बोगद्याचा वापर कसा करता येईल यासाठी स्मार्ट बोगद्याची संकल्पना शोधण्यात येणार आहे. 

8/11

युटिलिटी कॉरिडॉर

Mumbai Multi Model Tunnel Relief from Traffic jam connectivity with MMR

बोगद्यातून युटिलिटी कॉरिडॉर कसा बांधला जाऊ शकतो? पर्यावरणाची हानी होणार नाही याचाही अभ्यास केला जाणार आहे. टप्प्याटप्प्याने हा बोगदा कोणत्या कालावधीत बांधता येईल याचाही निर्णय घेतला जाईल.

9/11

बजेट रोड मॅप

Mumbai Multi Model Tunnel Relief from Traffic jam connectivity with MMR

हा बोगदा कितपत व्यावहारिक आहे याचाही अभ्यास करून अहवाल दिला जाणार आहे. या प्रकल्पासाठी बजेट रोड मॅप काय आहे, यावर समिती आपल्या सूचना देईल.

10/11

समितीमध्ये सदस्य

Mumbai Multi Model Tunnel Relief from Traffic jam connectivity with MMR

एमएमआरडीए आयुक्तांना या समितीचे उपाध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच  बीएमसीचे उपायुक्त (पायाभूत सुविधा), मुख्य अभियंता (पूल), मुख्य लेखाधिकारी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), मुख्य अभियंता एमएमआरडीए आणि मुख्य अभियंता एमएसआरडीसी यांना या समितीमध्ये सदस्य करण्यात आले आहे.

11/11

मास्टर प्लॅन

Mumbai Multi Model Tunnel Relief from Traffic jam connectivity with MMR

ही समिती एमएमआरमधील भविष्यातील कनेक्टिव्हिटीसह मुंबईसाठी स्मार्ट बोगद्यांच्या नेटवर्कसाठी एक मास्टर प्लॅन तयार करेल. बोगद्याच्या जाळ्यावर विविध तांत्रिक पर्याय सुचवले जातील. ज्यामध्ये डेकची संख्या आणि कोणत्या रहदारीची परिस्थिती असू शकते. तातडीची गरज आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन वेगवेगळ्या टप्प्यात त्याची अंमलबजावणी कशी करायची याचा मास्टर प्लॅनही तयार करेल.