मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद? जाणून घ्या यामागचं कारण

Mumbai News : 17 ऑक्टोबर (मंगळवारी) मात्र चित्र वेगळं असणार आहे. कारण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   

Oct 17, 2023, 08:24 AM IST

Mumbai News : मुंबई म्हटलं की या शहरात ये- जा करण्यांची मोठी संख्या आपल्या लक्षात येते. दर दिवशी विविध मार्गानंनी प्रवास करत  लाखोंच्या संख्येनं अनेकजण इथं येत असतात. यामध्ये विमानप्रवास करत शहरात येणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. 

1/7

विमानतळ बंद

Mumbai news international Airport to remain closed for 6 hours on 17 oct know the reason

Mumbai News : 17 ऑक्टोबर (मंगळवारी) मात्र चित्र वेगळं असणार आहे. कारण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   

2/7

सहा तास बंद

Mumbai news international Airport to remain closed for 6 hours on 17 oct know the reason

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ही अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण, कायमस्वरुपी नव्हे, तर 17 ऑक्टोबर या दिवशी काही तास विमानतळ बंद असेल.   

3/7

आंतरराष्ट्रीय विमानतळ

Mumbai news international Airport to remain closed for 6 hours on 17 oct know the reason

साधारण 6 तास म्हणजेच सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद असेल. विमानतळ बंद असल्यामुळं इथून कोणतंही विमान आकाशात झेपावणार नाही अथवा कोणतीही लँडिंगही होणार नाही  

4/7

दर दिवसाची उड्डाणं

Mumbai news international Airport to remain closed for 6 hours on 17 oct know the reason

दर दिवशी किमान 1 हजार उड्डाणं होणाऱ्या या विमानतळावरील कामकाज 6 तासांसाठी बंद राहील. यादरम्यान रनवेच्या दुरूस्ती आणि डागडुजीचं काम हाती घेण्यात येणार आहे.     

5/7

रनवेची देखभाल

Mumbai news international Airport to remain closed for 6 hours on 17 oct know the reason

पावसाचे दिवस आताच संपले असून, मान्सूननंतर विमानतळावरील रनवेची देखभाल केली जाणं तितकंच गरजेचं असतं.     

6/7

प्रवाशांचा खोळंबा कमीच

Mumbai news international Airport to remain closed for 6 hours on 17 oct know the reason

या अतिशय महत्त्वाच्या कारणामुळं रनवे आरडब्ल्यूवाई 09/27  आणि आरडब्ल्यूवाई 14/32 सहा तासांसाठी बंद असेल. इथं प्रवाशांचा खोळंबा होण्याता प्रश्न तसा कमीच उदभवतो.   

7/7

अपघात टाळण्यासाठी...

Mumbai news international Airport to remain closed for 6 hours on 17 oct know the reason

कारण, साधारण 6 महिन्यांपूर्वीच विमानतळ बंद असण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांकडून जारी करण्यात आल्या होत्या. कोणताही अपघात किंवा अप्रिय घटना टाळण्यासाठी या कामादरम्यान विमानतळ बंद ठेवण्याचा हा निर्णय घेतला.