मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मोनोरेल आज आणि उद्या बंद

मुंबईतील मोनोरेल दोन दिवस बंद असणार आहे. आधीच तोट्यात असलेली मोनोरेल पुढील दोन दिवस वडाळा डेपो ते चेंबूरदरम्यान दुपारी 2 वाजतापर्यंत बंद असणार आहे.

Nov 24, 2023, 10:00 AM IST
1/7

mumbai monorail

अचानक आलेल्या तांत्रिक कामांमुळे मोनो सेवा गुरुवार, 23 नोव्हेंबरपासून शनिवार, 25 नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे ही मार्गिका चालविणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) म्हटलं आहे.

2/7

Monorail 3

फेब्रुवारी 2014 मध्ये सुरू झालेली मुंबई मोनोरेल सातत्याने तोट्यात आहे. कुठल्याही मुख्य उपनगरी रेल्वेला संलग्न नसल्याने प्रवासीसंख्या मर्यादित आहे. या स्थितीत मोनोरेलला 2022- 23 या आर्थिक वर्षात 31 मार्चअखेरीस तब्बल 242 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. 

3/7

Monorail Loss

या संपूर्ण वर्षात प्रकल्पाला फक्त 13.41 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. यानंतर मार्गिकेसाठी 580 कोटी रुपयांच्या नवीन गाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव आहे. ही खरेदी भांडवली खर्चातील असेल. भांडवली खर्च ग्राह्य धरल्यास कंपनीचा हा तोटा 520 कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे. त्यामुळे दरमहा हा तोटा 44 कोटी रुपयांच्या घरात असणार आहे. 

4/7

MMRDA Monorail

दरम्यान, मुंबईत गणेशोत्सव मंडळांच्या दर्शनासाठी मोनोरेलचा वापर करण्याचे आवाहन 'एमएमआरडीए'ने केल्यानंतर त्या काळात 26 हजार 889 प्रवाशांची वाढ झाली होती. 

5/7

monorail 2

त्यानंतर या मार्गिकेवरील दोन फेऱ्यांमधील अंतर तीन मिनिटांनी कमी करून दैनंदिन फेऱ्यांची संख्याही 24ने वाढवण्यात आली होती. मात्र, आता अचानक उद्भवलेल्या कामामुळे काही भागात ही सेवा दुपारी 2 वाजतापर्यंत पूर्ण वेळ ठप्प असेल.

6/7

Monorail Routes between Wadala and Chembur

त्यामुळे वडाळा ते चेंबूरदरम्यानच्या मार्गिकेवरील सेवा ही दुपारी 2 वाजेपर्यंत खंडित राहील, तर दुपारी 2 नंतर वडाळा ते चेंबूरदरम्यान दर एक तासाच्या अंतराने मोनो सेवा सुरू असेल. 

7/7

Monorail Wadala to Sant Gadge Maharaj Chowk

तसेच वडाळा ते संत गाडगे महाराज चौक दरम्यानच्या मार्गिकेवरील सेवा नियमित वेळापत्रकानुसार कार्यरत राहणार आहे.