दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी उरला एक दिवस, राज ठाकरे यांनी दिला इशारा

Marathi Signboards on Shops : मराठी पाट्यांसाठी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या मुदतीचा शनिवारी म्हणजे 25 नोव्हेंबरला शेवटचा दिवस आहे. मुंबईतील तब्बल सात लाख दुकानं मुंबई महापालिकेच्या रडारवर आहेत. शनिवारनंतर पालिकेकडून धकड कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. दुसरीकडे मनसेही इशारा दिला आहे. 

| Nov 24, 2023, 20:27 PM IST

1/7

दुकानावर मराठी पाट्या लावा नाही तर दंड भरायला तयार राहा. कारण, शनिवारी म्हणजे 25 नोव्हेंबरपर्यंत दुकानांवरील पाट्या मराठीत लावल्या नाहीत तर प्रतिकामगार 2 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. (संग्रहित फोटो)

2/7

याबाबतची सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदत 25 नोव्हेंबरला संपतेय. त्यानंतर मुंबई महानगरपालिका धडक कारवाईला सुरुवात करणार आहे..(संग्रहित फोटो)

3/7

कारवाईपूर्वी कोणतीही पूर्वसूचना दिली जाणार नसून नामफलक मराठीत नसल्यास दुकानात जेवढे कामगार असतील त्याप्रमाणे प्रतिकामगार दोन हजार रुपये दंड आकारला जाईल. (संग्रहित फोटो)

4/7

या कारवाईत सात लाख दुकाने-आस्थापने मुंबई महापालिकेच्या रडारवर आहेत. 

5/7

मराठी पाट्यांच्या मुद्दयावरुन मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुकानांवर मराठी पाट्या दिसल्या नाहीत तर खळखट्ट्याक पद्धतीने उत्तर दिलं जाईल असा इशाराच मनसेने दिला आहे.

6/7

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांसदर्भात एक व्हिडिओही जारी केला आहे. तत्परतेने कारवाई होईल अशी अपेक्षा आहे अन्यथा आम्ही आहोतच, असं त्यांनी यात म्हटलं आहे.

7/7

कायदा हातात घेतात म्हणून महाराष्ट्र सैनिकांना केसेस टाकून छळलंत पण कायदा धाब्यावर बसविणाऱ्या ह्या महाराष्ट्रद्वेष्ट्यांवर काय कारवाई होते ते आता आम्ही पाहणार आहोत, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. (संग्रहित फोटो)