मुंबईकरांसाठी दिलासा! बेस्टच्या ताफ्यातल्या इ-बसेसच्या संख्या वाढणार

मुंबई : दररोज लाखो मुंबईकर बेस्ट (BEST) बसेसने प्रवास करतात. आता मुंबईकरांचा हा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. मुंबईच्या (Mumbai) ताफ्यात आता लवकरच इ-बसेसची (E-Bus) संख्या वाढणार आहे. मुंबईकरांच्या सुखकर आणि वेगवान प्रवासासाठी बेस्ट प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

May 20, 2023, 21:07 PM IST
1/5

बेस्ट प्रशासनाने 2100 सिंगल डेकर बसचा करार गेल्या वर्षी टाटा मोटर्स ने घेतलेल्या आक्षेपामूळे रखडला होता. आता बेस्ट प्रशासनाने घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवल्यामूळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. 

2/5

अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या ऑलेक्ट्रा आणि इव्हे ट्रान्सच्या इ बसेस आता बेस्टच्या ताफ्यात येणार असल्याने इ बसेसची संख्या वेगाने वाढणार आहे. सुप्रिम कोर्टाने यावर निर्णय देत निवीदा परत मागवण्याची सुचना बाजूला ठेवत बेस्ट प्रशासनाची 1400 बसेस साठीच्या कंत्राटदाराची निवड प्रक्रिया योग्य ठरवली. 

3/5

इव्हे ट्रान्सला मिळालेला 1400 सिंगल डेकर बसचा करार योग्य ठरला आहे. या बरोबरीने अजून 700 सिंगल डेकर बसची मागणी देखील त्यावेळेस बेस्टने  इव्हे ट्रान्सला दिली होती. त्यामूळे एकूण 2100 वातानूकुलीत, अत्याधूनिक  इ बसेस आता बेस्टच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील. 

4/5

जुन्या डिझेल बसेस या पर्यावरणीय नियमावली नुसार सेवेतून  बाद होत असल्याने बेस्ट ताफ्यात मागच्या काळात बसेसचा तुटवडा जाणवत होता. त्यामूळे प्रवाशांसाठी दोन बसेस दरम्यानचा प्रतिक्षा कालावधी सुध्दा वाढला होता. नविन बसेस सेवेत दाखल होणार असल्याने बेस्टच्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळेल. 

5/5

इ बसेस पर्यावरण पूरक तसंच आवाज रहित आणि वातानूकुलीत आहेत. त्या भाडेतत्वावर असल्याने त्यासाठी भांडवली खर्च बेस्ट प्रशासनावर येणार नाही त्यामूळे आर्थिक बोजा न घेता बेस्ट आपल्या ताफ्यातील बसेसची संख्या वेगाने वाढवू शकेल. तसेच यावरिल चालक आणि त्यांची देखभाल व विजेचा खर्च हा कंत्राटदाराने करायचा असल्याने बेस्टच्या प्रति किलोमीटर होणाऱ्या खर्चात देखील बचत होणार आहे.