टॅक्सीतून उतरला, गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात गोनी भरून कचरा टाकला, व्हिडिओ व्हायरल

जगभरात प्रदुषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. लोकांचा बेजबाबदारपणा आणि पर्यावरणाचा ऱ्हास याला प्रमुख कारण ठरतोय. सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाते. पण यानंतरही नियम धाब्यावर बसवले जाता. मुंबईतला  असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

| Nov 21, 2023, 21:13 PM IST
1/7

गेट वे ऑफ इंडिया या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी समुद्रात कचरा टाकत असलेला एक व्हिडिओ समोर आलं आहे.

2/7

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक व्यक्ती टॅक्सी घेऊन रस्त्याच्या किनाऱ्याल थांबतो आणि टॅक्सीतून फुलांच्या गोनी बाहेर काढतो.

3/7

त्यानंतर त्या फुलांनी भरलेल्या दोन ते तीन गोनी तो गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात खाली करतो. 

4/7

या घटनेचा व्हिडिओ जवळपास असलेल्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला आहे. हा व्हिडिओ त्या व्यक्तीने मुंबई पोलिसांना टॅग केलाय.

5/7

मुंबई गेट वे ऑफ इंडिया समुद्रात कचरा टाकणाऱ्या या व्यक्ती विरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलंय. 

6/7

त्या व्यक्तीविरोधात मुंबई महानगरपालिका कडून 10 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आलीये.  

7/7

या व्हिडिओवर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही संताप व्यक्त केला आहे. लोकांनी आपल्या सवयी बदलल्या नाहीत तर कोणतीही सुविधा शहराच्या सुशोभिकरणात बदल करु शकत नाहीत.