Mumtaz Birthday: शम्मी कपूरची अट मान्य केली नाही म्हणून मोडलं लग्न, राजेश खन्ना यांच्यासाठी खास तर जितेंद्र रोमान्स करायला घाबरायचे

Mumtaz Birthday: 70 च्या दशकातील बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिने राज्य केलं. त्या काळातील इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन अभिनेत्रींपैकी ती एक होती. करिअरच्या शिखरावर असताना तिने लग्न केलं आणि करिअरला ब्रेक लागला. 

| Jul 31, 2024, 11:13 AM IST
1/7

त्या काळातील सर्वोत्तम आणि सुंदर नायिकांबद्दल जेव्हा आपण बोलतो तर या अभिनेत्रीच नाव घेतलं जातं. त्याच्या एक्स्प्रेशन, अभिनय आणि स्टाइलने लोकांना वेड लावलं होतं. 

2/7

तिची आणि राजेश खन्ना यांची केमिस्ट्री अप्रतिम होती. त्यांची खास मैत्री होती. आम्ही बोलत आहोत यशस्वी अभिनेत्री मुमताज यांच्याबद्दल. मुमताज यांच्या लग्न करण्याचा निर्णय राजेश खन्ना यांना आवडला नव्हता. 

3/7

इराणमधील मशहदमधील मूळ कुंटुंब आणि अभिनेत्रीच्या जन्मानंतर अवघ्या वर्षभरात आई वडिलांचा घटस्फोट झाला. बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम आणि लहानपण गरीबमध्ये गेलं. 

4/7

करिअरच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने वयाच्या 26 व्या वर्षी लग्न केलं. तिच्या कारकिर्दीत तिने 25 चित्रपटांमध्ये काम केलं. वयाच्या 11 वर्षी सोने की चिडिया या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं. 

5/7

वयाच्या 14 व्या वर्षी दिग्दर्शक मोहम्मद हुसैन दारा सिंग यांची अभिनेत्री झाली. 'फौलाद' हा चित्रपट यशस्वी ठरला. मुमताजला बी-ग्रेड नायिका असल्याचा फटका सहन करावा लागला. ए-लिस्ट कलाकार त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यास टाळाटाळ करते असायचे. दिलीप कुमार आणि जितेंद्र हे अभिनेते तिच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यास नकार दिला होता. 

6/7

शम्मी कपूर आणि मुमताज यांच्या प्रेमाची बरीच चर्चा झाली आहे. दोघेही 'ब्रह्मचारी' चित्रपटात एकत्र दिसले होते. यामध्ये त्यांचे 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चा' हे हिट गाणे खूप लोकप्रिय झालं होतं. त्यांना लग्न करायचं होतं. पण कपूर घराण्याच्या परंपरेनुसार सून लग्नानंतर चित्रपटात काम करणार नाही. त्यामुळे त्यांचं नातं तुटलं. 

7/7

मुमताजने 1974 मध्ये उद्योगपती मयूर मेधवानीसोबत लग्न केलं. या दोघांना नताशा आणि तान्या मेधवानी असे दोन मुलं आहे. नताशाने अभिनेता फरदीन खानसोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या 18 वर्षानंतर हे दोघे विभक्त झालंय.