बिर्याणीसारख्या दिसणाऱ्या 'या' पदार्थाचं नाव तुम्हाला थेट इतिहासात नेईल; तो बनवणं म्हणजे एक कला...

Recipe in Marathi : या पदार्थाची पाळंमुळं इतिहासात नेतात. तर, त्याचा सुगंध आणि त्याचं रुप आपल्याला एका अशा दुनियेत नेतं जिथं फक्त आणि फक्त आपण एखाद्या वाऱ्याच्या झोताप्रमाणं वाहतच जातो. फार अलंकारिक वाटत असलं तरीही या पदार्थासाठी अशीच वर्णनं योग्य. 

Aug 15, 2023, 15:31 PM IST

Recipe in Marathi : तुम्हाला कधी एखाद्या पदार्थाविषयी वाचता वाचताच भूक लागलीये का? म्हणजे त्यातील साहित्य आणि हे पदार्थ तयार करण्याची कृती वाचून तुम्ही कधी ते चित्र डोळ्यांसमोर उभं केलं आहे का? केलं असेल तर ही माहितीसुद्धा तुमच्यातील खवैय्याला जागं करणार आहे. कारण हा पदार्थच आहे तसा. 

 

1/7

Recipe in Marathi

Mutanjan meat and rice dessert recipe

Recipe in Marathi : तुम्हाला कधी एखाद्या पदार्थाविषयी वाचता वाचताच भूक लागलीये का? म्हणजे त्यातील साहित्य आणि हे पदार्थ तयार करण्याची कृती वाचून तुम्ही कधी ते चित्र डोळ्यांसमोर उभं केलं आहे का? केलं असेल तर ही माहितीसुद्धा तुमच्यातील खवैय्याला जागं करणार आहे. कारण हा पदार्थच आहे तसा. 

2/7

पाळंमुळं इतिहासात

Mutanjan meat and rice dessert recipe

या पदार्थाची पाळंमुळं इतिहासात नेतात. तर, त्याचा सुगंध आणि त्याचं रुप आपल्याला एका अशा दुनियेत नेतं जिथं फक्त आणि फक्त आपण एखाद्या वाऱ्याच्या झोताप्रमाणं वाहतच जातो. फार अलंकारिक वाटत असलं तरीही या पदार्थासाठी अशीच वर्णनं योग्य. 

3/7

मुतंजन

Mutanjan meat and rice dessert recipe

समजा तुमच्या पुढ्यात एक ताट आलं. चांदीच्या ताटात लांब तांदळाचा भात, त्यावर केशराच्या पाण्याची बारीक धार, अधूनमधून डोकावणारे आणि तुपात डुंबून निघालेले काजू- बदाम, मनुका, मध्येत तुपाचा येणारा सुगंध आणि हलकंसं गोडसर चव असणारं तरीही कमालीचं मुरवलेलं मांस अशी सुरेख रचना पाहायला मिळाली तर? हे वर्णन बिर्याणीच्या जवळ जाणारं असलं तरीही त्याचं स्वतंत्र असं एक नाव आहे. हे नाव म्हणजे, 'मुतंजन'.

4/7

संदर्भ

Mutanjan meat and rice dessert recipe

फारसी आणि अरेबिक अशा भाषांमधील मुतज्जन या शब्दातून मुतंजनचा जन्म झाला असं म्हणतात. याचा अर्थ होतो तव्यात तळलेला. मध्यपूर्वेकडून या पदार्थाचा उगम झाल्याचं म्हटलं गेलं तरीही अरबांच्या खाद्यस्ंस्कृतीतही त्याचाशी साधर्म्य असणारे संदर्भ आढळतात. 16 व्या शतकादरम्यान अकबराच्या कालखंडातील वझिर अबुल फजल यांच्या लिखाणामध्ये मुतंजनचा उल्लेख आढळतो. जिथं तो शाही कुटुंबांच्या दावतींचा भाग असल्याचं सांगितलं गेलं आहे. 

5/7

खाद्यसंस्कृतींची देवाणघेवाण

Mutanjan meat and rice dessert recipe

मुतंजनची पाळंमुळं मात्र अद्यापही कोणाला सापडलेली नाहीत. पण, खाद्यसंस्कृतींची देवाणघेवाण आणि विविध संस्कृतींमधील समुदायांचा प्रवास या पदार्थाच्या प्रकारांमधून स्पष्टपणे दिसून येतो. तो तयार करण्याची प्रत्येकाची वेगळी आणि तितकीच खास पद्धत.   

6/7

असं म्हणतात की...

असं म्हणतात की, भारतीय मुस्लिम समुदायासाठी हा खास पदार्थ. देशाच्या उत्तर प्रदेशातील भागामध्ये लेकिची पाठवणी करतेवेळी मुतंजनची मोठी हांडी भरून नवरदेवाच्या घरी पाठवली जात असेल. निकाहाच्या वेळी दाटून येणाऱ्या भावभावनांचे पदर या पदार्थातूनही पाहायला मिळत होते. 

7/7

या पदार्थाचे संदर्भ सापडले तर ते नक्की वाचा

Mutanjan meat and rice dessert recipe

हल्लीच्या दिवसांमध्ये पारंपरिक पद्धतीनं तयार केला जाणारा मुतंजन तुम्हाला क्वचितच सापडेल. कारण, बऱ्याचदा जर्दा (पिवळसर गोड भात) आणि भाताचे इतर गोड प्रकार आणि मुतंजन यांच्यात गल्लत केली जाते. हो, पण काही मंडळी मात्र यातील फरक ओळखून पारंपरिक पद्धतीचा मुतंजन आजही बनवतात. त्यामुळं तुम्हाला जर या पदार्थाचे संदर्भ सापडले तर ते नक्की वाचा आणि शक्य असल्यास या पदार्थाची चवही एकदा चाखा....