पाहताक्षणीच मन प्रसन्न होते! नाशिकचा सोमेश्वर धबधबा खळाळला

नाशिकचा सोमेश्वर धबधबा पर्यटकांना आकर्षित करत आहे. 

| Aug 05, 2024, 23:38 PM IST

Someshwar waterfall Nashik Maharashtra : नाशिक जिल्हा हा पर्यटकांटा आवडता जिल्हा आहे. धार्मिक महत्व असलेल्या नाशिकमध्ये अनेक निसर्ग रम्य पर्यटनस्थळ देखील आहेत. पावसाळा सुरु झाल इथल्या निसर्ग पर्यटनाला बहर येतो. डोंगरांमधून प्रवाहित होणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. यापैकीच एक आहे नाशिकचा सोमेश्वर धबधबा. 

1/7

महिनाभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे सोमेश्वर धबधब्याचा सौंदर्य फुलले आहे. 

2/7

या धबधब्याच्या जवळच काही पायऱ्या देखील आहेत. जेणेकरून पर्यटकांना धबधब्याच्या आणखी जवळ जाता येऊ शकतो.

3/7

या धबधब्याचा प्रवाह हा इंग्रजीतील S अक्षरासारखा दिसतो. 

4/7

नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात हा सोमेश्वर धबधबा आहे. नाशिक शहरापासून सोमेश्वर हा धबधबा 11 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.    

5/7

या धबधब्यावर पर्यटकांची चांगलीच गर्दी पहायला मिळत आहे. सोमेश्वर धबधबा हा नाशिक जिल्ह्यातील आंबेडकर नगर येथील, गोदावरी नदीच्या पात्रात प्रवाहित होतो.  

6/7

पर्यटकांसाठी महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखला जाणारा सोमेश्वर धबधबा प्रवाहित झाला आहे.   

7/7

नाशिक शहरात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. यामुळे नाशिक मधील धबधबे प्रवाहित झाले आहेत.