#Rajyasabha : चाय पे चर्चा!

Sep 22, 2020, 09:56 AM IST
1/5

#Rajyasabha : चाय पे चर्चा!

देशाच्या राजकीय पटलावर सुरु असणाऱ्या हालचाली आणि काही दिवसांपूर्वीच राज्यसभेत कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरुन काही खासदारांनी घातलेला गोंधळ अनेक प्रश्न उपस्थित करुन गेला. अगदी नेतेमंडळींच्या वर्तणुकीपासून ते संसदेच्या प्रतिमेपर्यंतचे मुद्दे यात अधोरेखित झाले. 

2/5

#Rajyasabha : चाय पे चर्चा!

चर्चांच्या याच सत्रात मंगळवारी एक वेगळं आणि काहीसं अनपेक्षित चित्र पाहायला मिळालं. जेव्हा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करणाऱ्या आणि राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या खासदारांसाठी खुद्द उभसभापतीच या खासदारांसाठी चहा घेऊन आले.

3/5

#Rajyasabha : चाय पे चर्चा!

हरिवंश नारायण यांनी चहा घेऊन येणं हे अनेकांना सुखद धक्का देऊन गेलं. दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी तर उपसभापती हरिवंश नारायण यांच्यासमोरील नियमपुस्तिका फाडली, तसंच माईकही उखाडण्याचा प्रयत्न केला. यानंतर राज्यसभेतील वातावरण प्रचंड तापलं होतं. 

4/5

#Rajyasabha : चाय पे चर्चा!

राज्यसभेतील गोंधळाची परिस्थिती आणि त्यानंतर निर्माण झालेलं तणावाचं वातावरण पाहता, हरिवंश नारायण मनात कोणतीही कटुता न ठेवता निलंबित खासदारांसाठी चहा घेऊन आले. 

5/5

#Rajyasabha : चाय पे चर्चा!

मागील काही वर्षांतील देशातील अत्यंत टोकाचे राजकारण पाहता उपसभापतींची ही कृती सध्याच्या घडीला आश्वासक आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. (सर्व छायाचित्रे- एएनआय)