लिपस्टिक भारतात कशी आली माहितीये का?

National Lipstick Day 2024: भारतात 29 जुलै हा दिवस राष्ट्रीय लिपस्टिक दिवस म्हणून साजरा केला जातो. मेकअपमधील सर्वात महत्त्वाचं प्रॉडक्ट म्हणजे लिपस्टिक. एकवेळ फाउंडेशन नसलं तरी चालतं पण लिपस्टीकला स्त्रिया मोठ्या प्रमाणात पसंती देतात. 

Jul 29, 2024, 16:51 PM IST
1/11

मेकअपमधील सर्वात महत्त्वाचं प्रॉडक्ट म्हणजे लिपस्टिक. एकवेळ फाउंडेशन नसलं तरी चालतं पण लिपस्टीकला स्त्रिया मोठ्या प्रमाणात पसंती देतात. 

2/11

हल्ली मॅट, ड्राय, लिक्विड अशा वेगवेगळ्या स्वरुपात लिपस्टिकच्या शेड्स बाजारात मिळतात. त्याशिवाय  लिपस्टिकला मोठ्या प्रमाणात मागण्या देखील आहेत. पण तुम्हाला माहितेय का लिपस्टीक भारतात आली कशी ?   

3/11

लिपस्टिकचा इतिहास रंजक आहे. राणी एलिझाबेथ ओठांना रंगीत आणि सुंगधी द्रव्य लावायची त्यामुळे तिचं व्यक्तीमत्त्व धाडसी आणि राजेशाही वाटायचं. तिच्या या लिपस्टीकची जगभरात चर्चा होऊ लागली. 

4/11

भारतात राणीने पाऊल ठेवल्यावर अनेकांना तिच्या लिपस्टिकचं आकर्षण वाटू लागलं. तिचं अनुकरण बऱ्याच ब्रिटीश राण्यांनी केलं आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधीच्या काळात ओठांना लावल्या जाणाऱ्या सुंगधी द्रव्याचं आकर्षण  वाढू लागलं.   

5/11

जागतिक पातळीवर 4000 वर्षांपूर्वी लिपस्टिकचा शोध इराकमध्ये लागला असं म्हटलं जातं. अरेबियन देशात सुंगंधी द्रव्य जास्त तयार केलं जात होतं. 

6/11

इराकमध्ये ओठांचं सौंदर्य खुलवण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर करुन लिपस्टिक तयार केली जायची. 1915 मध्ये मॉरिस लेव्ही यांनी यात काही वेगळे घटक एकत्रित केले त्यानंतर हे सुगंधी द्रव्य गोठवून ते वापरण्यात यायला लागलं.   

7/11

पुढच्या काही काळात याला लिपस्टिक या नावाने ओळखलं जाऊ लागलं. भारतात 29 जुलै हा दिवस राष्ट्रीय लिपस्टिक  दिवस म्हणून साजरा केला जातो. 

8/11

आज सौंदर्यरप्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती झाली. केवळ भारतातच नाही तर जगभरातील स्त्रियांची लिपस्टिक या प्रकाराला सर्वात मोठी मागणी आहे. असं असलं तरी, तुमचा लुक चांगला दिसण्यासाठी परफेक्ट शेडची लिपस्टिक निवडणं गरजेचं आहे.त्यासाठी तुम्हाला तुमचा अंडरटोन माहित असणं गरजेचं आहे.    

9/11

कुल अंडरटोनच्या व्यक्तींची त्नचा साधारण गुलाबी रंगाची असते. त्यामुळे कुल अंडरटोनच्या  स्त्रियांनी लाल, पीच कलर किंवा फिकट गुलाबी रंगाची शेड शोभून दिसते. कुल अंडरटोनच्या स्त्रियांना न्यूड पिंक लिपस्टिकचा शेड शोभून दिसतो. अनुष्का शर्मा हीचा  कोल्ड अंडरटोन असल्याने तिच्यावर न्यूड पिंक लिपस्टिकचा शेड सुंदर दिसतो. 

10/11

वॉर्म अंडरटोनच्या स्त्रियांना हलक्याश्या ब्राउन रंगाची लिपस्टीक सूट करते. तुमच्या स्कीन टोनला मॅच होणारी लिपस्टिक तुमच्या मेकअपला अजूनज सुंदर बनवते. बोल्ड नारंगी, ब्रीक रेड कलर किंवा डार्क पिंक शेड ओठांवर छान दिसतो. जर तुमची त्वचा गोरी असेल तर   न्यूड कलर आणि जर तुमची सावळी त्वचा असेल डार्क न्यूड कलर तुमच्या ओठांवर छान दिसतो. दीपिका पादुकोन ही वॉर्म अंडरटोनमध्ये येते. 

11/11

न्युट्रल अंडरटोन असणाऱ्या स्त्रियांना सहसा कोणत्याही रंगाची शेड छान दिसते. त्यांचा अंडरटोन हा वॉर्म आणि कोल्ड या दोन्हींच मिश्रण असल्याने यांना हॉट किंवा न्यूड पिंक शेड तसंच पिच आणि बेबी पिंक कलर किंवा हॉट रेड देखील उठून दिसते.