महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिथे होते वाघाचे दर्शन, जगभरातून येतात पर्यंटक; कसं पोहोचाल?

दरवर्षी 29 जुलै रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो.देशभरात वाघांची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे.

| Jul 29, 2024, 09:13 AM IST

International Tiger Day 2024: दरवर्षी 29 जुलै रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो.देशभरात वाघांची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे.

1/7

महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान जिथे वाघ पाहण्यासाठी जगभरातून येतात पर्यंटक; कसं पोहोचाल?

International Tiger Day 2024 Tadoba Tiger Reserve Chandrapur Maharashtra Tourism Marathi News

International Tiger Day 2024: दरवर्षी 29 जुलै रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय वाघ दिवस साजरा केला जातो.देशभरात वाघांची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे. मानवी हस्तक्षेप, शिकार, अवैध व्यापार अशी अनेक कारणे यामागे आहेत. दरम्यान महाराष्ट्रात असं एक ठिकाण आहे. जिथे वाघाला प्रत्यक्षात पाहण्यासाठी जगभरातून पर्यंटक येतात.

2/7

वाघाचे दर्शन

International Tiger Day 2024 Tadoba Tiger Reserve Chandrapur Maharashtra Tourism Marathi News

महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानांमध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. ताडोबा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात असून 1955 साली त्याची  हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. ताडोबाच्या जंगलातून फिरताना कोणत्याही क्षणी तुम्हाला वाघाचे दर्शन होऊ शकते. 

3/7

सर्वोत्तम प्रकल्पांपैकी एक

International Tiger Day 2024 Tadoba Tiger Reserve Chandrapur Maharashtra Tourism Marathi News

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील सर्वोत्तम प्रकल्पांपैकी एक आहे. जैविक विविधता आणि नैसर्गिक वारसा लाभलेले ताडोबा घनदाट जंगलांने वेढलंय. येथे वाघ पाहण्यासाठी देशासह विदेशातून पर्यटक येतात.ताडोब्यात मागील आर्थिक वर्षभरात 4 लाख 5 हजार 888 पर्यटकांनी हजेरी लावली होती.

4/7

संरक्षित अभयारण्य

International Tiger Day 2024 Tadoba Tiger Reserve Chandrapur Maharashtra Tourism Marathi News

ताडोबा येथील दाट जंगल संरक्षित अभयारण्य म्हणून घोषित केले गेले आहे. या जंगलाच्या मध्यभागी ताडोरा नावाचा तलाव आहे. सुमारे 116 चौ. कि.मी. क्षेत्रावर पसरलेल्या जंगलात तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी पक्षी दिसतील. 

5/7

वाघासोबत आणखी काय?

International Tiger Day 2024 Tadoba Tiger Reserve Chandrapur Maharashtra Tourism Marathi News

तर वाघ, लांडगे, कोल्हे, रानकुत्रे, रान मांजरे, अस्वल, चारसिंगा, रान डुक्कर, चिंकारा, चितळ, सांबर हे प्राणी आणि अनेक सरपटणारे प्राणीही या जंगलात आढळतात. येथे सुमारे 250 प्रकारचे पक्षीही तुमच्या नजरेस पडतील.

6/7

50 वाघ

International Tiger Day 2024 Tadoba Tiger Reserve Chandrapur Maharashtra Tourism Marathi News

ताडोबा प्रकल्प आणि अंधारी अभयारण्याचे संयुक्तीकरण होऊन त्याचे त्याची ओळख आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अशी झाली आहे. यामध्ये राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. व्याघ्रप्रकल्पामुळे वाघांचे आकर्षणही वाढले आहे. आजच्या घडीला उद्यानात 50 वाघ असल्याची माहिती आहे.

7/7

कसे पोहोचाल?

International Tiger Day 2024 Tadoba Tiger Reserve Chandrapur Maharashtra Tourism Marathi News

तुम्हाला ताडोबाला जायचंय तर नागपूर विमानतळावर उतरा.  येथून 140 कि.मी. अंतरावर ताडोबा वसलंय. रेल्वेने जाऊ इच्छित असाल तर चंद्रपूर हे मुख्य मार्गावरील जवळचे रेल्वे स्टेशन आहे. येथून तुम्हाला बस किंवा खासगी गाडीने ताडोबामध्ये जाता येते. चंद्रपूर ते ताडोबा हे अंतर 45 कि.मी इतके आहे.