National Parents Day 2024 : आई-वडिलांप्रती मॅसेज करुन व्यक्त करा प्रेम, मराठमोळ्या शुभेच्छा देऊन व्यक्त करा भावना

आई-वडिलांप्रती व्यक्त करणारा कृतज्ञता, मॅसेज पाठवून द्या आनंद 

पालकांच्या प्रेमाला आणि त्यागासाठी समर्पित, पालक दिन दरवर्षी जुलैच्या चौथ्या रविवारी जगभरात साजरा केला जातो. यावर्षी 2024 मध्ये, 28 जुलै रोजी रविवार येत आहे, म्हणून आज हा विशेष दिवस साजरा केला जात आहे. तुमच्या पालकांना या सुंदर संदेशांसह शुभेच्छा द्या.

1/10

आईची ती प्रेमळ माया, बाबांची ती वटवृक्षाची छाया देवाने घडविली ही अजब किमया पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

2/10

मनातलं ओळखणारी आई, भविष्य ओळखणारा बाप, हे पाल्याचे एकमेव ज्योतिष असतात पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

3/10

 वेळ बदलते, काळ बदलतो परिस्थिती बदलते, माणसं बदलतात पण आईवडिलांचं प्रेम कधीच बदलत नाही कारण, ते प्रेम निस्वार्थ असतं पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

4/10

देवाची पूजा करून आई-बाबा मिळवता येत नाहीत पण आई- बाबांची पूजा करून देवाची कृपा नक्कीच मिळवता येते... पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

5/10

निस्वार्थ प्रेम आणि त्याग याचे एकतर्फी वचन पाळून मुलांचे सुयोग्य संगोपणन करणाऱ्या सर्व पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

6/10

स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

7/10

आईच्या ममतेचा आणि बाबांच्या क्षमतेचा अंदाज लावणं हे नक्कीच कठीण आहे अशा माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

8/10

देवा त्या पायांना नेहमी सुरक्षित ठेव ज्यांच्यामुळे मी आज माझ्या पायावर उभी आहे – माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

9/10

आईच्या ममतेचा आणि बाबांच्या क्षमतेचा अंदाज लावणं हे नक्कीच कठीण आहे अशा माझ्या पालकांना पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

10/10

ज्याला आई – बापाच्या कष्टाची जाणीव आहे तो कधीच वाईट मार्गाला लागत नाही, हेच आयुष्याचं सत्य आहे