रेल्वेकडून कोकणवासियांना गणेशोत्सवाचं मोठं गिफ्ट, 6 विशेष गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात

कोकण आणि गणेशोत्सव हे वेगळं नातं आहे. कितीही कामे असली तरी कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी गावी जातोच. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या खूप असते. आधीच आरक्षण फूल झाल्याने अनेक चाकरमान्यांना आतापर्यंत तिकिट काढता आले नाही. त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे.

| Jul 28, 2024, 11:43 AM IST

Special Trains For Ganeshotsav:कोकण आणि गणेशोत्सव हे वेगळं नातं आहे. कितीही कामे असली तरी कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी गावी जातोच. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या खूप असते. आधीच आरक्षण फूल झाल्याने अनेक चाकरमान्यांना आतापर्यंत तिकिट काढता आले नाही. त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे.

1/8

रेल्वेकडून कोकणवासियांना गणेशोत्सवाचं मोठं गिफ्ट, 6 विशेष गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात

Railway Gives Big Ganeshotsav gift to Konkan, special trains reservation started

कोकण आणि गणेशोत्सव हे वेगळं नातं आहे. कितीही कामे असली तरी कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी गावी जातोच. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या खूप असते. आधीच आरक्षण फूल झाल्याने अनेक चाकरमान्यांना आतापर्यंत तिकिट काढता आले नाही. त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे.

2/8

6 विशेष गाड्या

Railway Gives Big Ganeshotsav gift to Konkan, special trains reservation started

पश्चिम रेल्वेकडून कोकणासाठी 6 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. आजपासून तुम्हाला यासाठी रिझर्व्हेशन करता येणार आहे. दरम्यान या गाड्यांच्या किती फेऱ्या असतील? त्या कुठून सुटतील? याबद्दल जाणून घेऊया.

3/8

मुंबई सेंट्रल-ठोकूर दरम्यान 6 फेऱ्या

Railway Gives Big Ganeshotsav gift to Konkan, special trains reservation started

मुंबई सेंट्रल-ठोकूर दरम्यान 6 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. 3, 10 आणि 17 सप्टेंबर रोजी विशेष गाडी मुंबई सेंट्रल स्थानकावरून दुपारी 12 वाजता सुटेल असून दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी ठोकूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी बुधवारी 4, 11 आणि 18 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता ठोकूर येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7.05 वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचणार आहे.

4/8

मुंबई सेंट्रल-सावंतवाडी दरम्यान 26 फेऱ्या

Railway Gives Big Ganeshotsav gift to Konkan, special trains reservation started

मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड येथे विशेष गाडीच्या 26 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. 2 ते 16 सप्टेंबर या कालावधीत दररोज दुपारी 12 वाजता ही गाडी मुंबई सेंट्रलवरून सुटणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे अडीच वाजता सावंतवाडीला पोहोचेल. दररोज पहाटे 4.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 8.10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचणार आहे.  जाताना ही गाडी मंगळवारी धावणार नाही तर परतीच्या प्रवासात ही गाडी बुधवारी धावणार नाही, याची प्रवाशांनी नोंद घ्या.

5/8

वांद्रे-कुडाळदरम्यान 6 फेऱ्या

Railway Gives Big Ganeshotsav gift to Konkan, special trains reservation started

वांद्रे-कुडाळदरम्यान विशेष गाडीच्या 6फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.  वांद्रे टर्मिनस येथून 5, 12 आणि 19 सप्टेंबर रोजी दुपारी 2.40 वाजता सुटणारी गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता कुडाळ येथे पोहोचणार आहे. कुडाळ येथून 6, 13 आणि 20 सप्टेंबरला पहाटे 4.30 वाजता गाडी निघेल.

6/8

अहमदाबाद-कुडाळ दरम्यान 6 विशेष गाड्या

Railway Gives Big Ganeshotsav gift to Konkan, special trains reservation started

पश्चिम रेल्वेकडून अहमदाबाद-कुडाळ दरम्यान 6 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.ही विशेष गाडी अहमदाबाद येथून मंगळवार, 3, 10, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी कुडाळ येथून बुधवार, 4, 11, 18 सप्टेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता सुटेल आणि रात्री 11.45 वाजता अहमदाबाद येथे पोहोचणार आहे.

7/8

विश्वामित्री-कुडाळदरम्यान 6 फेऱ्या

Railway Gives Big Ganeshotsav gift to Konkan, special trains reservation started

विश्वामित्री-कुडाळदरम्यान विशेष गाडीच्या 6 फेऱ्या चालवल्या जातील.ही विशेष गाडी विश्वामित्री येथून 2, 9, 16 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुटणार आहे. परतीच्या प्रवासावेळी ही गाडी कुडाळ येथून मंगळवार, 3, 10, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 4.30 वाजता सुटणार आहे. 

8/8

अहमदाबाद-मंगळुरू दरम्यान 6 फेऱ्या

Railway Gives Big Ganeshotsav gift to Konkan, special trains reservation started

अहमदाबाद-मंगळुरू दरम्यान रेल्वेच्या 6 फेऱ्या असतील. ही विशेष गाडी अहमदाबाद येथून शुक्रवार, 6, 13 आणि 20 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7.45 वाजता मंगुळुरू येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासावेळी ही गाडी मंगुळुरू येथून शनिवार, 7, 14 आणि 21 सप्टेंबर रोजी रात्री 10.10 वाजता सुटेल आणि सोमवारी 2.15 वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल