Navratri 2023 : अर्ध शक्तीपीठ सत्तश्रृंगी देवीची महती नारी! आठ फूट उंचीची, अठरा भुजांची माता

सप्तशृंगी देवीचा महिमा राज्याबरोबर गुजरात ,मध्यप्रदेश कर्नाटक आदी राज्यातही आहे. त्यामुळे भाविकांची सदैव येथे गर्दी असते. अनेक भाविक देवीजवळ मनोभावे इच्छा प्रकट करतात त्या पूर्ण झाल्यावर आवर्जून येथे दर्शनासाठी येतात.

Oct 14, 2023, 21:25 PM IST

Nashik Saptshrungi Devi : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची वर्षभर गर्दी असते. स्वयंभू डोंगर कपारीत सिद्ध सप्तशृंगी देवीचा महिमा राज्याबरोबर परराज्यातही आहे.500 पायऱ्या चालून गेल्यावर देवीचे दर्शन होते.

1/7

नाशिकच्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावरील ही सप्तशृंगी माता. भारावलेल्या वातावरणात मनाला मोहिनी घालणारी ही आदिमाया स्वयंभू क्षेत्र आहे.  

2/7

सप्तशृंगी ट्रस्टच्या वतीने येथे भाविकांसाठी भक्त निवास ,प्रसादालय आदींसह विविध सेवा सुविधांची सोय करण्यात आली आहे.गडावर विविध मंदिरेही आहे.त्रिगुणात्मक अश्या आद्यस्वरूपात शक्तीपीठ म्हणून सप्तशृंगी देवीचा उल्लेख पौराणिक ग्रंथातून आढळतो. 

3/7

सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सव, चैत्रोत्सव आणि कोजागिरी पौर्णिमेला यात्रा भरते.यावेळी लाखो भाविक येथे दर्शनाला येतात. देवीची दररोज त्रिकाल पूजा ,महापूजा आणि आरती , मध्यान्न आरती , शेज आरती आदी धार्मिक कार्यक्रम होतात.

4/7

भगवतीला अठरा हात आहे. प्रत्येक हातात तिने वेगवेगळे आयुधे धारण केली आहे.डोक्यावर मुकुट,कानात कर्णफुलं, नाकात नथ,गळ्यात मंगळ सूत्र ,पुतळ्याचे गाठलं,कमरेला कमरपट्टा पायात तोडे, असं अलंकृत मातेचं रूप आहे. 

5/7

डोंगर कपारीत आठ फूट उंचीची शेंदूर चर्चित रक्त वर्णीय अशी आदिमाया श्री सप्तशृंगी माता भाविकांना गडावर दिसते. दर्शन झाल्यावर मन प्रसन्न होतं. भक्तांचा थकवा नाहीसा होतो.  

6/7

वळणाचा निसर्गरम्य घाट पार करून देवीचं डोंगर कपारीत वसलेलं देवीच स्वयंभू सप्तशृंगी देवीच्या नयनरम्य मंदिराचं दर्शन होत. गडावर जाण्यासाठी 500 पायऱ्या चढाव्या लागतात. 

7/7

मनावर दडपण आणतांना कातळकडा पाहतांना शिखरावर पोहचताच विस्तीर्ण परिसर पाहतांना आपल्याला अनंत अगम्यपणाची जाणीव होते. मग श्रद्धेने आपण आदिमायेच्या शरण जातो.आपल्या विचारांमध्ये एक अनामिक चैतन्य प्रकटत अश्या प्रत्येक क्षणी आदिमाया सप्तशृंगी देवीचं दर्शन भारलेपण देऊन जातं.