Navratri 3nd Day : बंध नात्यांचे...रंग ऋणानुबंधाचे! नवरात्रीचं तिसरं नातं : घट्ट मैत्रिणीचं

Navratri 3nd Day : नवरात्रीचा तिसरा दिवस हा चंद्रघंटा देवीच्या आराधनेचा असतो. नवरात्रीचं तिसरं नातं हे घट्ट मैत्रिणीचं...  

Oct 17, 2023, 13:45 PM IST

Navratri 3nd Day : नवरात्रीच्या नऊ दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवस देवाच्या एका रुपाची पूजा केली जाते. तर वारानुसार रंग परिधान केला जातो. 

1/7

नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा देवीची आराधना केली जाते. ही देवी धन, आनंद, ऐश्वर्य, सौभाग्य आणि आरोग्य प्रदान करणारी आहे.

2/7

तीचं रूप सौम्य असलं तरी ते दुर्गेचे रूप असल्याने ती वाघावर आरूढ आहे. तिच्या हातात विविध शस्त्र आहेत. अतिशय सुंदर अंगकांती असणाऱ्या या देवीने लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे..

3/7

शिवाची आराधना करण्यासाठी देवी पार्वती जेव्हा घरातून बाहेर पडली तेव्हा तिच्या आईने, तुझ्या समवेत दोन सख्यांना घेऊन जा, म्हणजे आम्हाला तुझी काळजी राहणार नाही अशी विनंती केली.

4/7

मैत्रिणींमधला हा विश्वास लाल रंग दर्शवतो. हा तेजाचा रंग... चैतन्याचा रंग... आपल्या शरीरातील सप्तचक्रांपैकी मुलाधार चक्राचा रंग हि लाल मानला जातो.  तसचं प्रेमाचा, विश्वासाचा रंग ही लाल मानला जातो. 

5/7

म्हणूनच घट्ट मैत्रीण असल्यासारखं भाग्य नाही. मनाचा गोंधळ उडत असेल तर तिला विश्वासाने सांगावं. अडीअडचणीच्या वेळी जिला हक्काने हाक मारावी. खूप आनंदात असताना जिला घट्ट मिठी मारावी, अशी ही मैत्रीण..

6/7

या मैत्रीचा कलश विश्वास, आपलेपणा, प्रेम, सचोटी या चौरंगावर शोभून दिसतो.   

7/7

आजचा  दिवस आपल्या घट्ट मैत्रिणीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा मैत्रिचा दिवस