लाँच होण्याआधीच Hyundai Venue N Line चे फोटोज् व्हायरल, हे आहेत खास फीचर्स

Hyundai Motors India ने Venue N Line ही कार लाँच करण्याआधीच तिच्या डिटेल्सचा खुलासा केला आहे. या SUV कारला लवकरच लाँच केलं जाणार आहे.

Aug 25, 2022, 18:17 PM IST
1/5

Hyundai Venue N Line ची डिझाईन

नवीन Hyundai Venue N Line या कारमध्ये बंपर, फेंडर्स, साइड सिल आणि रूफ रेल्स पर रेड हाइलाईट्स दिसत आहे. स्पोर्टी टेलगेट स्पॉयलर, साइड फेंडर्सवरील एन लाईन मोनिकर, टेलगेट आणि रेड ब्रेक कॅलिपर त्याच्या ऍथलेटिक लुकमध्ये भर घालत आहेत.

2/5

Hyundai Venue N Line चं केबिन

कंपनीने नवीन व्हेन्यू एसयूव्हीच्या केबिनमध्ये स्पोर्टियर थीम देखील दिली आहे. Hyundai Venue N Line या कारमध्ये गीअर नॉब, सेंटर कन्सोल आणि डॅशबोर्डवर रेड इंसर्टसोबत ऑल-ब्लॅक इंटीरियर मिळतो. याशिवाय, आगामी एसयूव्हीला ब्ल अपहोल्स्ट्रीमध्ये सीट्स आणि डोर ट्रिम्सवर कॉन्ट्रास्ट रेड स्टिचिंग देण्यात आले आहे.  

3/5

Hyundai Venue N Line चे फीचर्स

कॉम्पॅक्ट SUV ची स्पोर्टियर व्हर्जन वायरलेस ऍपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटीसह 8.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एक BOSS ऑडिओ सिस्टम, ब्लूलिंक कनेक्टेड कार तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक सनरूफ यांसारख्या फीचर्स येईल. याशिवाय या कारमध्ये 60 हून अधिक Hyundai BlueLink कनेक्टेड कार फीचर्स उपलब्ध असतील.

4/5

Hyundai Venue N Line ची सेफ्टी

Hyundai Venue N Line मध्ये ड्युअल एअरबॅग्ज, ब्रेक असिस्ट सिस्टम, EBD सह ABS, ISOFIX, हिल असिस्ट कंट्रोल, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, सर्व 4 डिस्क ब्रेक्स, पार्किंग असिस्ट सेन्सर आणि कॅमेरा आणि हेडलॅम्प एस्कॉर्ट सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतील.

5/5

Hyundai Venue N Line ची लॉन्चिंग आणि बुकिंग

Hyundai Venue N Line ही कार 6 सप्टेंबर 2022 रोजी लॉन्च होणार आहे. 21,000 रुपये टोकन रक्कम भरून हे बुक करता येईल. ग्राहक ह्युंदाई क्लिक टू बाय प्लॅटफॉर्मवर किंवा देशभरातील ह्युंदाई सिग्नेचर आउटलेटवर SUV ऑनलाइन प्री-बुक करू शकतात.