टॉपचं मायलेज आणि कमी किंमत असणाऱ्या या बाईक्स ठरतील पेट्रोल वाढीवर बेस्ट ऑप्शन...

Best Indian Bike under 1 lakh :  कमी किंमतीत उत्तम मायलेज देणारी आणि आकर्षक लूक असणारी बाईक घ्यायचीये? तर चिंता सोडा. हिरो (Hero) , बजाज (BAJAJ) आणि टीव्हीएस (TVS) कंपन्यांच्या 'या' बाईक्सची किंमत एक लाखाहून कमी आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत 'या' बाईक्स...

Aug 25, 2022, 15:23 PM IST
1/8

Splendor Plus

कमी किंमतीत उत्तम फीचर्स असलेली Splendor Plus ही बाईक खुप लोकप्रिय आहे. Splendor Plus या बाईकचं 97.2cc BS6 इंजिन, ड्रम ब्रेक आणि दमदार मायलेज हे या बाईकची वैशिष्ट्ये आहेत. या बाईकची किंमत 71,978 रुपये (एक्स शोरुम) आहे.

2/8

TVS Radeon

5 व्हेरिएंट आणि वेगवेगळ्या 12 रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या TVS Radeon ची किंमत  59,925 रुपये ते 76,694 रुपये (एक्स शोरुम) आहे. TVS Radeon LED DRLs, USB चार्जिंग पोर्ट, रबर टँक ग्रिप्स यांसारखे अनेक फीचर्स या बाईकमध्ये आहेत. 

3/8

Honda Shine

एक लाख रुपयांमध्ये सर्वात जास्त मायलेज देणारी बाईक्सपैका एक म्हणजे Honda Shine. एक लिटर पेट्रोलमध्ये ही बाईक 55 kmpl इतकं मायलेज देते. Honda Shine ही बाईक दोन व्हेरिएंट आणि 5 रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. या बाईकची किंमत 77,378 रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरु होते.

4/8

Bajaj Pulsar 125 Neon

बजाज कंपनीच्या बाईक्सपैकी सर्वात जास्त विकली जाणारी बाईक म्हणजे Bajaj Pulsar 125 Neon. या बाईकची किंमत 90,003 रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरु होते.

5/8

TVS Star City

109.7 cc इंजिन असलेल्या TVS Star City या बाईकची किंमत 72,305 रुपये (एक्स शोरुम) आहे. या बाईकला 10,999 रुपयांच्या डाउनपेमेंटमध्ये देखील खरेदी करु शकता. 

6/8

Hero Glamour XTEC

हिरो कंपनीची Glamour XTEC या बाईकची किंमत 84,220 रुपये (एक्स शोरुम) आहे. या बाईकमध्ये 124.7cc चं इंजिन उपलब्ध आहे.

7/8

Bajaj Platina

उत्तम मायलेजसाठी लोकप्रिय असलेली बजाज प्लाटिना (Bajaj Platina) ही बाईक एका लिटरमध्ये 75-90 किमी मायलेज देते. या बाईकची किंमत 63,130 रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरु होते. 

8/8

Hero Passion Pro

Hero Passion Pro या बाईकची किंमत 72,620 रुपये (एक्स शोरुम) आहे. ही बाईक 6 व्हेरिएंट आणि 7 कलरमध्ये खरेदी करता येते.