New rules from April 1 : एप्रिल महिन्यापासून 'या' नियमांमधील बदलांमुळे खिशाला फटका बसणार

New rules from April 1 : सीएनजी, एलपीजीपासून अगदी दागदागिन्यांच्या नियमांमध्येही बदल होणार आहेत. तेव्हा या बदलांना सामोरं जाण्यासाठी तयार व्हा. 

Mar 29, 2023, 08:37 AM IST

New rules from April 1 : असं म्हणतात बदल, काळाची गरज आहे. पण, जेव्हा हेच बदल आपल्या आर्थिक गणितांवर परिणाम करु लागतात तेव्हा मात्र पायाखालची जमीन सरकायचीच बाकी असते. कारण, या बदलांमुळं इतक्या मेहनतीनं बसवलेली आर्थिक घडी विस्कटत जाते. नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच 1 एप्रिलपासून असेच काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. ज्यामुळं तुमच्या खिशावरही परिणाम होणार आहेत. 

1/6

New rules

New rules from April 1 share market to bank and cng lpg rate updates

अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी यापुढं दिव्यांग व्यक्तींना युडीआयडी म्हणजेच विशेष ओळखपत्र गरजेचं असणार आहे. हे युडीआयडीच्या पोर्टलवरून त्यांना मिळवला येईल.   

2/6

Gold purchase

New rules from April 1 share market to bank and cng lpg rate updates

यापुढं सहा अंकी हॉलमार्क असलेले दागिनेच वैध ठरणार आहेत. त्यामुळं दागिने खरेदी करताना लक्ष असू द्या. 

3/6

lpg, cng

New rules from April 1 share market to bank and cng lpg rate updates

नियमाप्रमाणं दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी आणि सीएनजीचे दरही निर्धारित केले जातात. त्यामुळं या दरांतही बदल होऊ शकतात. 

4/6

policy

New rules from April 1 share market to bank and cng lpg rate updates

पुढील बदल म्हणजे, विमा पॉलिसीचा प्रीमियम 5 लाखांहून जास्त असल्यास उत्पन्नावर कर लागणार आहे.   

5/6

bank holidays

New rules from April 1 share market to bank and cng lpg rate updates

एप्रिल महिन्यात बँक कर्मचाऱ्यांची चांदी आहे. कारण एकदोन नव्हे तब्बल 15 दिवस बँकांना विविध कारणांनी सुट्ट्या मिळणार आहेत. तेव्हा बँकांची कामं ताबडतोब उरकून घ्या. 

6/6

cars

New rules from April 1 share market to bank and cng lpg rate updates

एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून मारुती, टाटा, होंडा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प यांसारख्या वाहन उत्पादक कंपन्या त्यांच्या वाहनांमध्ये दरवाढ लागू करणार आहेत.