सायरा बानो नव्हे, हिच्या एका स्माईलवर फिदा होते दिलीप कुमार! 'त्या' संध्याकाळी असं काय घडलं की प्रेम राहिलं अपूर्ण?

Entertainment : दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची लव्हस्टोरी चाहत्यांना माहितीय. पण सायरा बानो यांच्या पूर्वी दिलीप कुमार यांना दुसऱ्या अभिनेत्रीशी लग्न करायच होत. पण त्या एका घटनेमुळे त्यांची प्रेम कहाणी अपूर्ण राहिली. 

| Jul 12, 2024, 15:26 PM IST
1/11

बॉलिवूडमध्ये अशा अनेक प्रेम कहाणी आहेत ज्या काही ना काही कारणामुळे पूर्ण होऊ शकल्या नाहीत. त्यातील एक आहे दिलीप कुमार आणि मधुबाला यांची. 1957 मधील 'तराना' चित्रपटातून दिलीप कुमार आणि मधुबाला यांची प्रेम कहाणी सुरु झाली. पहिल्याच भेटत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण या प्रेम कहाणीत मधुबाला यांनी पुढाकार घेतला.   

2/11

मधुबाला यांनी दिलीप कुमार यांना एका खास पद्धतीने प्रपोज केलं होतं. दिलीपकुमार यांना पत्र आणि त्यासोबत एक गुलाबाचं फूलही पाठवलं. त्या अभिनेत्रीने लिहिलं होतं की, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर कृपया हे गुलाबाचं फूल स्विकारा. दिलीप कुमार यांना मधुबाला आवडत होत्या. त्यांनीही ते फूल लगेचच स्विकारलं.  

3/11

मीडिया रिपोर्टनुसार असं सांगितलं जात की, जेव्हा मधुबाला यांची जिथे जिथे शूटिंग सुरु असायची तिथे दिलीप कुमार पोहोचायचे. मधुबाला आणि दिलीप कुमार एकमेकांच्या प्रेमात वेडे होते असं म्हणतात.   

4/11

दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी तराना, संगदिल, अमर, मुघल-ए-आझम यांसारख्या सदाबहार चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. मधुबाला आणि दिलीप कुमार यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचले होते. पण मधुबालाचे वडील अताउल्ला खान यांच्यामुळे त्यांचं नातं तुटलं आणि ही प्रेमकहाणी अपूर्णच राहिली.

5/11

दिलीप कुमार आणि मधुबाला यांना लग्न करायचं होतं, पण लग्नाआधी दिलीप यांनी मधुबालाला चित्रपट आणि तिचे वडील दोघेही सोडण्याची अटी घातली होती. पण दिलीप कुमार यांची ही गोष्ट मधुबालाला अजिबात आवडली नाही कारण मधुबाला तिच्या वडील अताउल्लावर खूप प्रेम करायची. 

6/11

या दोन कारणामुळे मधुबाला आणि दिलीप कुमारमध्ये वाद सुरू झाले. 1956 मध्ये जेव्हा बीआर चोप्राने नया दौर चित्रपटाच्या शूटिंगसाठी भोपाळमध्ये शूटिंग करण्याचा निर्णय घेतला तेव्हा परिस्थिती आणखी हाताबाहेर गेली. 

7/11

मधुबालाच्या वडिलांना मुंबईबाहेर जाऊन शूटिंग करणं मान्य नव्हतं. चित्रपटात मधुबालाच्या जागी वैजंती माला साईन करण्यात आलं. या प्रकरणी दिलीप कुमार यांनीही बीआर चोप्रा यांना पाठिंबा दिल्याचं बोलं जातं. 

8/11

चोप्रा यांनी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन याची माहितीही दिली होती की, जाहिरातीत मधुबालावर कट चिन्ह होतं आणि त्या जागी वैजंतीमालाचा फोटो लावण्यात आला होता. अताउल्ला खान यांचा वागण्यातून त्यांना राग आला आणि प्रत्युत्तरात त्यांनी मधुबालाच्या सर्व चित्रपटांची नावं असलेली एक जाहिरात दिली आणि 'नया दौर' या नावावर कट चिन्ह टाकलं. 

9/11

इतकंच नाही तर अताउल्ला यांनी या प्रकरणावरून दोघांमध्ये भांडण सुरू झाली आणि चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यासाठी कोर्टात केसही दाखल करण्यात आली होती. 1956 मध्ये जेव्हा बीआर चोप्राने नया दौर चित्रपटाच्या शूटिंगसाठी भोपाळमध्ये शूटिंग करण्याचा निर्णय घेतला तेव्हा परिस्थिती आणखी बिघडली.

10/11

कोर्टातील सुनावणीदरम्यान दिलीप कुमार यांनाही साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी दिलीप यांना कोर्टात देखील विचारण्यात आलं की, तुमचं मधुबालावर प्रेम आहे का, तेव्हा दिलीप कुमार सर्वांसमोर म्हणाले की हो, मी मधुबालावर प्रेम करतो आणि नेहमीच करत राहीन, पण आता खूप उशीर झालाय,.मधुबाला दिलीप कुमार यांच्या वर्तनाने दु:खी होती. दिलीप कुमारही मधुबालाची मानधरणी करु शकले नाहीत आणि त्यामुळे बॉलिवूडची ही प्रेमकहाणी अपूर्णच राहिली.

11/11

23 फेब्रुवारीला मधुबाला यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यावेळी दिलीप कुमार मद्रासमध्ये एका चित्रपटाचे शूटिंग करत होते. ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत, खूप उशीर झाला होता. त्या दुर्दैवी संध्याकाळी ते घरी पोहोचले पण तोपर्यंत अभिनेत्रीचं अंतिम संस्कार होऊन गेलं होतं. शेवटच्या क्षणीही मधुबाला आणि दिलीप कुमार यांची भेट झाली नाही.