Most Expensive Birds: 'हे' आहेत जगातील सर्वात महाग पक्षी, किंमत ऐकून डोळे गरगरतील

अनेकांना पक्षी (Bird) किंवा प्राणी (Animals) पाळण्याचा छंद असतो. आपल्या आवडत्या पाळीव प्राणी किंवा पक्षासाठी ते वाट्टेल ती किंमतही मोजायला तयार असतात. जगातील सर्वात महाग पाळीव श्वानाची (Pet Dog) किंमत करोडोंच्या घरात आहे. आता पक्षाची किंमतही कोट्यवधी असल्याचं पाहिल मिळतंय. सर्वात महागड्या पक्षी कोण आहे आणि त्याची किंमत साधारण किती असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता? जाणून घ्या उत्तर

| May 27, 2023, 21:58 PM IST

Most Expensive Bird : अनेकांना पक्षी (Bird) किंवा प्राणी (Animals) पाळण्याचा छंद असतो. आपल्या आवडत्या पाळीव प्राणी किंवा पक्षासाठी ते वाट्टेल ती किंमतही मोजायला तयार असतात. जगातील सर्वात महाग पाळीव श्वानाची (Pet Dog) किंमत करोडोंच्या घरात आहे. आता पक्षाची किंमतही कोट्यवधी असल्याचं पाहिल मिळतंय. सर्वात महागड्या पक्षी कोण आहे आणि त्याची किंमत साधारण किती असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकता? जाणून घ्या उत्तर

1/5

जगातील सर्वात महागडा पक्षी  हा रेसिंग कबूतर आहे. 2020 मध्ये अरमांडो (Armando) नावाच्या एक रेसिंग कबूतर (Racing pigeons) $1.4 मिलिअन म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 115 कोटी रुपयांत विकला गेला होता. अरमांडो हा चॅम्पियन रेसर आहे. रेसिंग कबूतरांना त्यांच्या वेगासाठी पाळल जातं. आखाती देशात कबूतरांच्या स्पर्धा होतात आणि यासाठी करोडो रुपये खर्च केले जातात रेसिंग कबूतराचा उडण्याचा वेग प्रती तास 60 मील इतका असतो. अरमांडोच्या नावावर सर्वात महागड्या पक्षाची नोंद आहे. हा विक्रम अद्याप तुटलेला नाही.

2/5

यानंतर नंबर लागतो तो ब्लॅक पाम कॉकटू (Black Palm Cockatoo) नावाच्या पोपटाचा. हा जातीचा पोपट न्यू गिनीमध्ये आढळतो. काळे पंखे आणि मोठ्या चोचीसाठी हा पोपट प्रसिद्ध आहे आणि दिसायला तो खूपच आकर्षक असतो. या पोपटाची किंमत $ 15,000 म्हमजे जवळपास 12 लाख रुपये इतकी आहे. 

3/5

Hyacinth Macaw या जातीचा पोपट जगातील सर्वात मोठा पोपट म्हणून ओळखला जोता. हा जवळपास 3 फूट लांब असतो. Hyacinth Macaw हा आता खुपच दुर्मिळ झाला आहे. याची किंमत $10,000 म्हणजे जवळपास 8 लाख रुपये इतकी आहे. 

4/5

आयम सेमानी ही कोंबडी इंडोनेशियामध्ये आढळते. काळे पंख, काळी त्वचा आणि काळं मांस यासाठी ही कोंबडी ओळखली जाते. अयम सेमानी कोंबडीची किंमतही तितकीच जास्त आहे. ही कोंबडी $ 2,500 म्हणज जवळपास 2 लाखांपर्यंत जाते.

5/5

स्कार्लेट टॅनेजर (Scarlet Tanager) नावाचा पक्षी हा मध्यम आकाराचा असून तो उत्तर अमेरिकेत आढळतो. चमचमत्या लाल-काळ्या पंखांमुळे हा पक्षी खुपच सुंदर दिसतो. हा पक्षी फारसा महागडा नाही. तरीही इतर पक्षांच्या तुलनेत या पक्षाची किंमत $ 900 म्हणजे जवळपास 74 हजार रुपये इतकी असू शकते.