1000 किलो वजन नसतानाही 1 टनचा एसी का म्हणतात? जाणून घ्या...

सध्या उन्हाच्या तीव्र झळा बसत असल्याने अनेकांनी एसीच्या खरेदीला पसंती दिली आहे. पण जेव्हा जेव्हा एसीचा उल्लेख केला जातो तेव्हा त्यात टन हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो. खरेदीपूर्वीही किती टनाचा एसी घ्यायचा यावरच चर्चा सुरू असते. पण या एसीचा आणि टन या वजनाच्या प्रमाणाचा काय संबंध?

May 27, 2023, 18:33 PM IST
1/7

AC weight

ज्यांच्या घरात एसी आहे, त्यांनाही या टनाचा अर्थ कळत नाही. बहुतेक लोक हे एसीचे वजन आहे समजतात. जर तुम्हालाही ही माहिती नसेल तर 1 टन किंवा 1.5 टनच्या एसीचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया.  

2/7

ton is a measure of weight

टन हे वजन मोजण्याचे प्रमाण आहे. उदाहरणार्थ, 1000 किलो म्हणजे 1 टन. किलोपासून क्विंटल पर्यंत ही देशी मानके आहेत, तर टन हे विदेशी मानक आहेत. पण एसीसाठी त्याचा अर्थ बदलतो.

3/7

AC weight

दुकानात गेल्यावर तुम्हाला किती टनचा एसी घ्यायचा आहे असे विचारले जाते. मात्र तुम्ही खरेदी करताना तुम्हाला तितक्या टनाचा एसी दिला जात नाही.

4/7

 ton in AC refers to the capacity to cool a room

एसीमधील टन हा शब्द खोली किंवा ड्रॉइंग फॉर्म किंवा हॉल थंड करण्याची क्षमता दर्शवतो. म्हणजेच एसी जितका जास्त टन असेल तितकी जास्त कूलिंग क्षमता असते.

5/7

AC Ice cold

1 टन एसी असेल तर 1 टन इतक्या बर्फाचा थंडावा तुमच्या खोलीत निर्माण होईल. तसेच 2 टनचा एसी 2 टन बर्फाप्रमाणे कूलिंग करेल. हा असा याचा साधा अर्थ आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आ

6/7

AC Room

याचा संबंध तुमच्या खोलीच्या आकारासोबत देखील असतो. जर तुमची खोली 10 बाय 10 म्हणजेच 100 स्क्वेअर फूट असेल तर तुमच्यासाठी 1 टन एसी पुरेसा आहे. खोली 100 स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त आणि 200 स्क्वेअर फुटांपेक्षा कमी असल्यास 1.5 टन एसी लागेल. दुसरीकडे, 200 चौरस फुटांपेक्षा जास्त खोलीसाठी, 3 टनचा एसी घेणे चांगले.  

7/7

1 Ton AC

जर तुमची खोली 100 स्क्वेअर फूट म्हणजेच 170 स्क्वेअर फूट पेक्षा मोठी असेल आणि तुम्ही फक्त 1 टनचा एसी लावला असेल, तर संपूर्ण खोलीला 1 टन बर्फाएवढी थंडता मिळणार नाही. म्हणजे 1 टन एसी एवढ्या मोठ्या खोलीसाठी पुरेसा थंडावा देऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत, खोली थंड होण्यास बराच वेळ लागू शकतो