IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची एक चूक आणि...! कांगारूंवर ओढावली पराभवाची नामुष्की

Biggest Reason of Australia's Loss: चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकपमधील पाचवा सामना रंगला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्स राखून पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

Oct 09, 2023, 14:19 PM IST
1/5

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंजादांची सुरुवात फार वाईट झाली. मात्र यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी डाव सारवत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

2/5

मुख्य भारताचे तीन विकेट लवकर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवण्याची चांगली संधी होती. मात्र यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या झालेल्या एका चूकीमुळे कांगारूंना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. 

3/5

जोश हेझलवूड 8व्या ओव्हरसाठी गोलंदाजी करत होता. यावेळी ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर कोहलीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि बॉल हवेत गेला.

4/5

यावेळी विकेटकीपर अॅलेक्स कॅरी आणि फिल्डींग करणारा मिचेल मार्श बॉल पकडण्यासाठी धावला. मात्र बॉलपर्यंत पोहोचूनही मार्शला कॅच पकडता आला नाही.

5/5

यावेळी भारताचा स्कोर 3 विकेट गमावून 20 रन्स इतकाच होता. शिवाय कोहली केवळ 12 रन्सवर फलंदाजी करत होता. हा कॅच सोडण्याचा परिणाम ऑस्ट्रेलियाला पराभवासह भोगावा लागला.