रक्षाबंधननिमित्त विशेष योगायोग; 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

भावा-बहिणीच्या नात्याचं प्रतिक 'रक्षाबंधन'

Aug 03, 2020, 08:38 AM IST

आज रक्षाबंधन... पण कोरोनाचं सावट असल्यामुळे अनेक बहिणींना आपल्या भावाला भेटता येणार नाही. भावा-बहिणीच्या नात्याचं प्रतिक म्हणजे 'रक्षाबंधन'. तस पाहायला गेलं तर यंदाचा रक्षाबंधण अत्यंत खास आहे. कारण आज श्रावण पौर्णिमा, संस्कृत दिन, अन्नधान, माता गायत्री जयंती, नारळी पौर्णिमा, श्रावणातील दुसरा सोमवार यांसारखे विशेष योगायोग जुळून आले आहेत.  

 

1/5

रक्षाबंधन आयुष्मान योग

रक्षाबंधन आयुष्मान योग

ज्योतिषांच्या मते, आज रक्षाबंधननिमित्त आयुष्मान योग जुळून येत आहे.

2/5

ताटातील कुंकचं महत्त्व

ताटातील कुंकचं महत्त्व

लाल रंग म्हणजे प्रेम, उत्साह, परमानंद आणि पराक्रमाचे प्रतिक.  त्यामुळे राखी बांधण्यापूर्वी भावाला कुंकवाचा टिळा नक्की लावा. 

3/5

अक्षता

अक्षता

भावाला कुंकू लावल्यानंतर त्यावर आपण अक्षता म्हणजे तांदळाचे काही दाणे लावतो. पण तांदळाच्या दाण्यांचे तुकडे झालेले नसावे. 

4/5

राखी बांधण्यासाठी मुहुर्त

राखी बांधण्यासाठी मुहुर्त

ज्योतिषांच्या मते, राखी बांधण्यासाठी सर्वश्रेष्ठ शुभ मुहूर्त सकाळी ९.२५ ते ११.३० पर्यंत असणार आहे.

5/5

संध्याकाळी देखील बांधू शकता राखी

संध्याकाळी देखील बांधू शकता राखी

सकाळी भावाच्या हाताला राखी बांधणं शक्य नसल्यास दुपारी ३.५० ते ५.१५ देखील उत्तम वेळ आहे.